1 थेस्सलनीकाकरांस 2 : 1 (IRVMR)
{आपल्या सुवार्ताप्रसारक कामाचे पौल समर्थन करतो} [PS] बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हासही माहीत आहे.
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 2 (IRVMR)
परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, हे तुम्हास माहीतच आहे, मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 3 (IRVMR)
कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 4 (IRVMR)
तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हास पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही मनुष्यांना खूश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूश होईल तसे बोलतो.
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 5 (IRVMR)
कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलो नाही. देव साक्षी आहे;
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 6 (IRVMR)
आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हास आपला विशेष अधीकार चालवता आला असता तरी आम्ही मनुष्यांपासून, तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करीत नव्हतो;
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 7 (IRVMR)
तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 8 (IRVMR)
आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हास केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो. [PE][PS]
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 9 (IRVMR)
बंधूनो, आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हास आहे; तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस उद्योग करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 10 (IRVMR)
तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांत आम्ही पवित्रतेने, नीतिने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 11 (IRVMR)
तुम्हास ठाऊकच आहे की, पिता आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की,
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 12 (IRVMR)
जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्यास शोभेल असे तुम्ही चालावे. [PS]
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 13 (IRVMR)
{छळ} [PS] या कारणांमुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 14 (IRVMR)
बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे अनुकरण करणारे झाला, म्हणजे त्यांनी यहूदयांच्या हातून जी दुःखे सोसली तशीच तुम्हीही आपल्या स्वदेशीयांच्या हातून सोसली;
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 15 (IRVMR)
त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 16 (IRVMR)
परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलावे याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत रहावे; त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे. [PS]
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 17 (IRVMR)
{पौलाचे आपल्या वाचकांकडे लक्ष} [PS] बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 18 (IRVMR)
ह्यांमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छा धरली; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले परंतु सैतानाने आम्हास अडविले.
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 19 (IRVMR)
कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत, त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? तुम्हीच आहात ना?
1 थेस्सलनीकाकरांस 2 : 20 (IRVMR)
कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: