1 थेस्सलनीकाकरांस 3 : 1 (IRVMR)
{तीमथ्याकडे सोपवलेली कामगिरी} [PS] म्हणून आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनै शहरातच एकटे मागे रहावे, हे आम्हास बरे वाटले.
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 2 (IRVMR)
आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 3 (IRVMR)
तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात.
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 4 (IRVMR)
कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हास माहीतच आहे.
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 5 (IRVMR)
ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित परीक्षकाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. [PE][PS]
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 6 (IRVMR)
आता तीमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्याविषयीची शुभवर्तमान आम्हाकडे आणले;
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 7 (IRVMR)
ह्यामुळे बंधूनो, आम्हास आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले;
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 8 (IRVMR)
कारण जर तुम्ही प्रभूमध्ये खंबीरपणे टिकता तर आता आम्ही जिवात जीव आल्यासारखे राहतो.
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 9 (IRVMR)
कारण आपल्या देवापुढे, आम्ही तुमच्याकरता, ज्या सर्व आनंदामुळे आनंद करतो त्याबद्दल आम्ही देवाला तुमच्याकरीता काय धन्यवाद देऊ शकणार?
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 10 (IRVMR)
आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हास तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासांतील उणे आहे ते पूर्ण करावे. [PE][PS]
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 11 (IRVMR)
देव, आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा, आमचे तुम्हाकडे येणे कुठलीही अडचण न येता होऊ देवो;
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 12 (IRVMR)
आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;
1 थेस्सलनीकाकरांस 3 : 13 (IRVMR)
ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: