1 थेस्सलनीकाकरांस 5 : 1 (IRVMR)
प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 2 (IRVMR)
कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 3 (IRVMR)
“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 4 (IRVMR)
बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 5 (IRVMR)
कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 6 (IRVMR)
ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 7 (IRVMR)
झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 8 (IRVMR)
परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 9 (IRVMR)
कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 10 (IRVMR)
प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 11 (IRVMR)
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 12 (IRVMR)
म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात. निरनिराळे सद्बोध व पत्राची समाप्ती आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 13 (IRVMR)
आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 14 (IRVMR)
आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 15 (IRVMR)
आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 16 (IRVMR)
सदोदित आनंद करा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 17 (IRVMR)
नित्य प्रार्थना करा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 18 (IRVMR)
प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 19 (IRVMR)
पवित्र आत्म्याला विझवू नका.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 20 (IRVMR)
संदेशाचा उपहास करू नका.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 21 (IRVMR)
सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 22 (IRVMR)
वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 23 (IRVMR)
आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 24 (IRVMR)
तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 25 (IRVMR)
बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 26 (IRVMR)
सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 27 (IRVMR)
मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 : 28 (IRVMR)
आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28