1 तीमथ्याला 2 : 1 (IRVMR)
सार्वजनिक उपासनेबाबत सूचना तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या.
1 तीमथ्याला 2 : 2 (IRVMR)
आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
1 तीमथ्याला 2 : 3 (IRVMR)
कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
1 तीमथ्याला 2 : 4 (IRVMR)
त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.
1 तीमथ्याला 2 : 5 (IRVMR)
कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
1 तीमथ्याला 2 : 6 (IRVMR)
त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे.
1 तीमथ्याला 2 : 7 (IRVMR)
आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी खरे सांगतो; खोटे सांगत नाही, असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.
1 तीमथ्याला 2 : 8 (IRVMR)
म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी.
1 तीमथ्याला 2 : 9 (IRVMR)
त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.
1 तीमथ्याला 2 : 10 (IRVMR)
तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.
1 तीमथ्याला 2 : 11 (IRVMR)
स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे.
1 तीमथ्याला 2 : 12 (IRVMR)
मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे.
1 तीमथ्याला 2 : 13 (IRVMR)
कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा.
1 तीमथ्याला 2 : 14 (IRVMR)
आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.
1 तीमथ्याला 2 : 15 (IRVMR)
तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15