1 तीमथ्याला 4 : 1 (IRVMR)
खोटे शिक्षण देणाऱ्याविषयी देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
1 तीमथ्याला 4 : 2 (IRVMR)
ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.
1 तीमथ्याला 4 : 3 (IRVMR)
ते लोकांस लग्न करण्यास मना करतील व जे अन्न विश्वास ठेवणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील.
1 तीमथ्याला 4 : 4 (IRVMR)
तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही.
1 तीमथ्याला 4 : 5 (IRVMR)
कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
1 तीमथ्याला 4 : 6 (IRVMR)
जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
1 तीमथ्याला 4 : 7 (IRVMR)
परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.
1 तीमथ्याला 4 : 8 (IRVMR)
कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.
1 तीमथ्याला 4 : 9 (IRVMR)
हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे.
1 तीमथ्याला 4 : 10 (IRVMR)
याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
1 तीमथ्याला 4 : 11 (IRVMR)
तीमथ्याचा खाजगी जीवनक्रम व शिक्षण या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव.
1 तीमथ्याला 4 : 12 (IRVMR)
कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.
1 तीमथ्याला 4 : 13 (IRVMR)
मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.
1 तीमथ्याला 4 : 14 (IRVMR)
तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको.
1 तीमथ्याला 4 : 15 (IRVMR)
या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी.
1 तीमथ्याला 4 : 16 (IRVMR)
आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16