2 करिंथकरांस 1 : 1 (IRVMR)
नमस्कार व धन्यवाद देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,
2 करिंथकरांस 1 : 2 (IRVMR)
देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
2 करिंथकरांस 1 : 3 (IRVMR)
आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो.
2 करिंथकरांस 1 : 4 (IRVMR)
तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
2 करिंथकरांस 1 : 5 (IRVMR)
कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
2 करिंथकरांस 1 : 6 (IRVMR)
आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते.
2 करिंथकरांस 1 : 7 (IRVMR)
आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
2 करिंथकरांस 1 : 8 (IRVMR)
बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.
2 करिंथकरांस 1 : 9 (IRVMR)
खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले.
2 करिंथकरांस 1 : 10 (IRVMR)
त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
2 करिंथकरांस 1 : 11 (IRVMR)
तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे.
2 करिंथकरांस 1 : 12 (IRVMR)
पौलाचे शुद्ध हेतू आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
2 करिंथकरांस 1 : 13 (IRVMR)
कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात, त्यावाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहीत नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो.
2 करिंथकरांस 1 : 14 (IRVMR)
त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
2 करिंथकरांस 1 : 15 (IRVMR)
त्याची भेट पुढे ढकलण्यात आली आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा.
2 करिंथकरांस 1 : 16 (IRVMR)
मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे.
2 करिंथकरांस 1 : 17 (IRVMR)
असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?
2 करिंथकरांस 1 : 18 (IRVMR)
पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.
2 करिंथकरांस 1 : 19 (IRVMR)
कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता तर त्याच्यात होय अशीच होती.
2 करिंथकरांस 1 : 20 (IRVMR)
कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
2 करिंथकरांस 1 : 21 (IRVMR)
आता, जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे.
2 करिंथकरांस 1 : 22 (IRVMR)
तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
2 करिंथकरांस 1 : 23 (IRVMR)
मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मरुन आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथला आलो नाही.
2 करिंथकरांस 1 : 24 (IRVMR)
आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवितो असे नाही पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24