2 पेत्र 1 : 1 (IRVMR)
आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र;
2 पेत्र 1 : 2 (IRVMR)
देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळत राहो.
2 पेत्र 1 : 3 (IRVMR)
ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
2 पेत्र 1 : 4 (IRVMR)
त्यांच्यायोगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत; ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे.
2 पेत्र 1 : 5 (IRVMR)
ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची
2 पेत्र 1 : 6 (IRVMR)
ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला सुभक्ती,
2 पेत्र 1 : 7 (IRVMR)
आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा.
2 पेत्र 1 : 8 (IRVMR)
कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील.
2 पेत्र 1 : 9 (IRVMR)
ज्याच्या ठायी या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे; अदूरदृष्टीचा आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे;
2 पेत्र 1 : 10 (IRVMR)
म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही.
2 पेत्र 1 : 11 (IRVMR)
आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल.
2 पेत्र 1 : 12 (IRVMR)
जागृत राहण्याबाबत इशारा या कारणास्तव, जरी तुम्हास या गोष्टी माहित आहेत आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हास त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन.
2 पेत्र 1 : 13 (IRVMR)
मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते.
2 पेत्र 1 : 14 (IRVMR)
कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल.
2 पेत्र 1 : 15 (IRVMR)
आणि माझे निघून जाणे झाल्यानंतरही या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन.
2 पेत्र 1 : 16 (IRVMR)
पेत्राची स्वतःची साक्ष व संदेष्ट्यांची साक्ष
मत्त. 17:5; मार्क 9:7; लूक 9:35 कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे ऐश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो.
2 पेत्र 1 : 17 (IRVMR)
कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
2 पेत्र 1 : 18 (IRVMR)
त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.
2 पेत्र 1 : 19 (IRVMR)
शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.
2 पेत्र 1 : 20 (IRVMR)
तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही.
2 पेत्र 1 : 21 (IRVMR)
कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21