2 थेस्सलनीकाकरांस 3 : 1 (IRVMR)
शेवटचा सदबोध व पत्राची समाप्ती शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे;
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 2 (IRVMR)
आणि हेकेखोर व दुष्ट मनुष्यांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वाच्या ठायी विश्वास आहे असे नाही.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 3 (IRVMR)
परंतू प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हास स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 4 (IRVMR)
तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 5 (IRVMR)
प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 6 (IRVMR)
बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 7 (IRVMR)
आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही;
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 8 (IRVMR)
आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 9 (IRVMR)
तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालू द्यावे म्हणून असे केले.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 10 (IRVMR)
कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 11 (IRVMR)
तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही ऐकतो.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 12 (IRVMR)
अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 13 (IRVMR)
तुम्ही तर बंधूंनो, बरे करतांना खचू नका.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 14 (IRVMR)
या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका;
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 15 (IRVMR)
तरी त्यास शत्रू समजू नका, तर त्यास बंधू समजून त्याची कानउघडणी करा.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 16 (IRVMR)
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 17 (IRVMR)
शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हास शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. मी, पौलाने, स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.
2 थेस्सलनीकाकरांस 3 : 18 (IRVMR)
आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18