2 तीमथ्थाला 3 : 1 (IRVMR)
जवळ येऊन ठेपलेली संकटे परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे.
2 तीमथ्थाला 3 : 2 (IRVMR)
लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक
2 तीमथ्थाला 3 : 3 (IRVMR)
इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी.
2 तीमथ्थाला 3 : 4 (IRVMR)
विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील;
2 तीमथ्थाला 3 : 5 (IRVMR)
ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
2 तीमथ्थाला 3 : 6 (IRVMR)
मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वाईट अभिलाषांनी भरलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवतात.
2 तीमथ्थाला 3 : 7 (IRVMR)
अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
2 तीमथ्थाला 3 : 8 (IRVMR)
यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत.
2 तीमथ्थाला 3 : 9 (IRVMR)
ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत कारण जसा त्यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
2 तीमथ्थाला 3 : 10 (IRVMR)
संकटापासून बचाव तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे, ही ओळखून आहेस,
2 तीमथ्थाला 3 : 11 (IRVMR)
अंत्युखिया, इकुन्या आणि लुस्र या शहरांमध्ये ज्या गोष्टी माझ्याबाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे, परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.
2 तीमथ्थाला 3 : 12 (IRVMR)
खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
2 तीमथ्थाला 3 : 13 (IRVMR)
पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.
2 तीमथ्थाला 3 : 14 (IRVMR)
पण तुझ्याबाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा.
2 तीमथ्थाला 3 : 15 (IRVMR)
तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
2 तीमथ्थाला 3 : 16 (IRVMR)
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
2 तीमथ्थाला 3 : 17 (IRVMR)
यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17