2 तीमथ्थाला 4 : 1 (IRVMR)
सुयुद्ध केल्यावर मिळणारा मुकुट देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,
2 तीमथ्थाला 4 : 2 (IRVMR)
वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.
2 तीमथ्थाला 4 : 3 (IRVMR)
मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील.
2 तीमथ्थाला 4 : 4 (IRVMR)
सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील.
2 तीमथ्थाला 4 : 5 (IRVMR)
पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
2 तीमथ्थाला 4 : 6 (IRVMR)
कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे.
2 तीमथ्थाला 4 : 7 (IRVMR)
मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.
2 तीमथ्थाला 4 : 8 (IRVMR)
आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
2 तीमथ्थाला 4 : 9 (IRVMR)
संदेश व नमस्कार माझ्याजवळ लवकर येण्याचा प्रयत्न कर.
2 तीमथ्थाला 4 : 10 (IRVMR)
कारण देमास मला सोडून थेस्सलनीका शहरास गेला आहे कारण त्यास जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीया प्रांतास गेला आहे व तीत दालमतीया प्रांतास गेला आहे.
2 तीमथ्थाला 4 : 11 (IRVMR)
लूक मात्र माझ्याजवळ आहे, जेव्हा तू येशील तेव्हा मार्कालाही तुझ्याबरोबर घेऊ नये कारण सेवेकरता तो मला उपयोगी आहे.
2 तीमथ्थाला 4 : 12 (IRVMR)
तुखिकाला मी इफिस शहरास पाठवले आहे.
2 तीमथ्थाला 4 : 13 (IRVMR)
त्रोवस शहरात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये.
2 तीमथ्थाला 4 : 14 (IRVMR)
आलेक्सांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील.
2 तीमथ्थाला 4 : 15 (IRVMR)
त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता.
2 तीमथ्थाला 4 : 16 (IRVMR)
पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये.
2 तीमथ्थाला 4 : 17 (IRVMR)
प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.
2 तीमथ्थाला 4 : 18 (IRVMR)
प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
2 तीमथ्थाला 4 : 19 (IRVMR)
प्रिस्कीला, अक्विला आणि अनेसिफरच्या घरातील लोकांस सलाम सांग.
2 तीमथ्थाला 4 : 20 (IRVMR)
एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता.
2 तीमथ्थाला 4 : 21 (IRVMR)
2 तीमथ्थाला 4 : 22 (IRVMR)
तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेस, लीन व क्लौदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात. प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22