प्रेषितांचीं कृत्यें 2 : 1 (IRVMR)
{पवित्र आत्म्याचे दान} [PS] नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 2 (IRVMR)
अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 3 (IRVMR)
आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 4 (IRVMR)
तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 5 (IRVMR)
त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 6 (IRVMR)
तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 7 (IRVMR)
ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना?
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 8 (IRVMR)
तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 9 (IRVMR)
पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आशिया,
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 10 (IRVMR)
फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी,
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 11 (IRVMR)
क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 12 (IRVMR)
तेव्हा ते सर्व विस्मित होऊन; व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, “हे काय असेल?”
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 13 (IRVMR)
परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत.” योए. 2:28-32 [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 14 (IRVMR)
{पेन्टेकॉस्टच्या वेळेचे पेत्राचा उपदेश} [PS] तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेम शहरातील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 15 (IRVMR)
तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 16 (IRVMR)
परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे: [QBR]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 17 (IRVMR)
देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, [QBR] मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, [QBR] तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. [QBR] तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. [QBR]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 18 (IRVMR)
आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर [QBR] व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, [QBR] म्हणजे ते संदेश देतील. [QBR]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 19 (IRVMR)
आणि वर आकाशात अद्भूते [QBR] व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ [QBR] अशी मी दाखवीन. [QBR]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 20 (IRVMR)
परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी [QBR] सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 21 (IRVMR)
तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.” [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 22 (IRVMR)
“अहो इस्राएल लोकांनो, या गोष्टी ऐका: नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भूते व चिन्हे तुम्हास दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 23 (IRVMR)
तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुम्ही त्यास धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 24 (IRVMR)
त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 25 (IRVMR)
दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, [QBR] ‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे; [QBR] मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. [QBR]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 26 (IRVMR)
म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच [QBR] आणखी माझा देह ही आशेवर राहील. [QBR]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 27 (IRVMR)
कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, [QBR] व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. [QBR]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 28 (IRVMR)
जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; [QBR] ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’ ” [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 29 (IRVMR)
“बंधुजनहो, कुलाधिपति दावीद: ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 30 (IRVMR)
तो संदेष्टा होता, आणि त्यास ठाऊक होते की देवाने त्यास अभिवचन दिले की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 31 (IRVMR)
ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या: पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्यास मृतलोकात सोडून दिले नाही, व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 32 (IRVMR)
त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 33 (IRVMR)
म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 34 (IRVMR)
कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, [QBR] ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, [QBR]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 35 (IRVMR)
मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत [QBR] तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ ” [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 36 (IRVMR)
“म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.”
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 37 (IRVMR)
हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 38 (IRVMR)
पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 39 (IRVMR)
कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.”
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 40 (IRVMR)
आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून; म्हटले, “या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 41 (IRVMR)
तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्यादिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार मनुष्यांची भर पडली. [PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 42 (IRVMR)
{ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन} [PS] ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत. [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 43 (IRVMR)
तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 44 (IRVMR)
तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही सामाईक होते,
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 45 (IRVMR)
ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत.
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 46 (IRVMR)
ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;
प्रेषितांचीं कृत्यें 2 : 47 (IRVMR)
सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत, असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: