प्रेषितांचीं कृत्यें 23 : 1 (IRVMR)
मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 2 (IRVMR)
तेव्हा महायाजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 3 (IRVMR)
तेव्हा पौल त्यास म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 4 (IRVMR)
तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या महायाजकाची निंदा करितोस काय?”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 5 (IRVMR)
पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे.” [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 6 (IRVMR)
तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मरण पावलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 7 (IRVMR)
तो हे बोलत आहे तोंच परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकात फुट पडली.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 8 (IRVMR)
कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 9 (IRVMR)
तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे नियमशास्त्र शिक्षक, परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, “या मनुष्याच्या ठायी आम्हास काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 10 (IRVMR)
असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे. [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 11 (IRVMR)
त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.” [PS]
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 12 (IRVMR)
{यहूद्यांचा पौलाविरुद्ध कट} [PS] मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 13 (IRVMR)
हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 14 (IRVMR)
ते मुख्य याजक लोक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 15 (IRVMR)
तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.” [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 16 (IRVMR)
तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 17 (IRVMR)
तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 18 (IRVMR)
तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, या तरूणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 19 (IRVMR)
तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 20 (IRVMR)
तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 21 (IRVMR)
तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 22 (IRVMR)
तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 23 (IRVMR)
मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.”
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 24 (IRVMR)
आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 25 (IRVMR)
शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 26 (IRVMR)
“महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया याचा सलाम.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 27 (IRVMR)
या मनुष्यास यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 28 (IRVMR)
आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 29 (IRVMR)
तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 30 (IRVMR)
या मनुष्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे, वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे.” [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 31 (IRVMR)
शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 32 (IRVMR)
आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 33 (IRVMR)
कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले.
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 34 (IRVMR)
पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे; तो किलीकीयाचा आहे समजल्यावर,
प्रेषितांचीं कृत्यें 23 : 35 (IRVMR)
त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” आणि ‘त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकुम सोडला. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: