प्रेषितांचीं कृत्यें 25 : 1 (IRVMR)
{फेस्तासमोर पौलाची चौकशी} [PS] मग फेस्त सुभ्यांत आल्यावर तीन दिवसानी कैसरीयाहून वर यरूशलेम शहरास गेला.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 2 (IRVMR)
तेव्हा मुख्य याजक व यहूद्यांतील मुख्य पुरूष ह्यांनी त्याच्याकडे पौलाविरूद्ध फिर्याद नेली.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 3 (IRVMR)
आणि, कृपाकरून त्यास यरूशलेम शहरात बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 4 (IRVMR)
फेस्ताने उत्तर, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 5 (IRVMR)
म्हणून त्या मनुष्याचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.” [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 6 (IRVMR)
मग तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 7 (IRVMR)
तो आल्यावर यरूशलेम शहराहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 8 (IRVMR)
पौलाने प्रत्युत्तर केले की, “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, परमेश्वराच्या भवनाचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.”
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 9 (IRVMR)
तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, “यरूशलेम शहरात जाऊन तेथे माझ्यापुढे या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?”
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 10 (IRVMR)
तेव्हा पौलाने म्हटले, “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहीजे, मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 11 (IRVMR)
मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.”
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 12 (IRVMR)
तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.” [PS]
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 13 (IRVMR)
{अग्रिप्पा व बर्णीका} [PS] मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 14 (IRVMR)
तेथे ती पुष्कळ दिवस राहिली, तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक मनुष्य येथे आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 15 (IRVMR)
मी यरूशलेम शहरास गेलो होतो तेव्हा यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडीलांनी फिर्याद करून त्याच्याविरुध्द ठराव व्हावा म्हणून विनंती केली.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 16 (IRVMR)
त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरीता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही.”
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 17 (IRVMR)
म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या मनुष्यास आणण्याचा हुकूम केला.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 18 (IRVMR)
त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्याविरुध्द बोलण्यास उभे राहिले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 19 (IRVMR)
उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणाएका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरून यहूदी लोकांनी त्या मनुष्याशी वाद केला, येशू हा जरी मरण पावलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 20 (IRVMR)
या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना, तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्यास यरूशलेम शहरास नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्यास विचारले.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 21 (IRVMR)
सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्यास तुरुंगातच ठेवावे.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 22 (IRVMR)
यावर अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते,” फेस्ताने त्यास उत्तर दिले, “उद्या,” त्याचे म्हणणे, “तुम्ही ऐकू शकाल.” [PE][PS]
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 23 (IRVMR)
म्हणून दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला, तेव्हा फेस्ताच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 24 (IRVMR)
मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्यास पाहा! याच्याच विषयी यरूशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे, याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 25 (IRVMR)
परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही, असे मला आढळून आले आणि त्याने स्वतःच आपणांला सम्राटाकडून [* कैसराकडून ] न्याय मिळावा अशी मागणी केली, म्हणून मी त्यास कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरवले आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 26 (IRVMR)
परंतु सम्राटाला याच्याविषयी निशिचत असे कळवावे, असे माझ्याकडे काही नाही, म्हणून मी याला तुमच्यापुढे आणि विशेषतः राजा अग्रिप्पापुढे आणून उभे केले आहे, ते अशाकरिता की, या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे.
प्रेषितांचीं कृत्यें 25 : 27 (IRVMR)
शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही.” [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: