प्रेषितांचीं कृत्यें 4 : 1 (IRVMR)
न्यायसभेपुढे पेत्र व योहान पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 2 (IRVMR)
कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते म्हणून त्यांना फार संताप आला.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 3 (IRVMR)
तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 4 (IRVMR)
तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला; आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 5 (IRVMR)
मग दुसऱ्या दिवशी असे झाले, की त्यांचे अधिकारी, वडील व नियमशास्त्र शिक्षक हे यरूशलेम शहरात एकत्र जमले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 6 (IRVMR)
त्यामध्ये महायाजक हन्ना व कयफा, योहान, आलेक्सांद्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक ते होते.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 7 (IRVMR)
त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, “हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने, किंवा कोणत्या नावाने केले?”
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 8 (IRVMR)
तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता, त्यांना म्हणाला, “अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो, आणि वडिलांनो,
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 9 (IRVMR)
एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे?
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 10 (IRVMR)
तर तुम्हा सर्वास व सर्व इस्राएल लोकांस हे माहित असावे, की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मरण पावलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 11 (IRVMR)
जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला तो हाच आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 12 (IRVMR)
आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.”
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 13 (IRVMR)
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 14 (IRVMR)
तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून, यहूदी पुढाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 15 (IRVMR)
मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 16 (IRVMR)
ते म्हणाले, “या मनुष्यांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वास माहित आहे; व ते आपण नाकारू शकत नाही.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 17 (IRVMR)
परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.”
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 18 (IRVMR)
मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 19 (IRVMR)
परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 20 (IRVMR)
कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही.”
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 21 (IRVMR)
तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी. हे त्यांना काहीच सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 22 (IRVMR)
कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 23 (IRVMR)
पेत्र व योहान आपल्या मित्रांकडे परत येतात तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 24 (IRVMR)
ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 25 (IRVMR)
तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद, याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले, ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या?
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 26 (IRVMR)
प्रभूविरूद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी एकत्र जमले.’
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 27 (IRVMR)
कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक, येशू, ह्याच्याविरुद्ध या नगरात परराष्ट्रीय व इस्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 28 (IRVMR)
यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 29 (IRVMR)
तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 30 (IRVMR)
तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भूते घडावी असे ही कर.”
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 31 (IRVMR)
आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 32 (IRVMR)
समाईक निधी तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता: आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामाईक होते.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 33 (IRVMR)
आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 34 (IRVMR)
त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 35 (IRVMR)
आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले, मग जसजशी कोणाला गरज लागत असे, तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 36 (IRVMR)
आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती.
प्रेषितांचीं कृत्यें 4 : 37 (IRVMR)
त्याची जमीन होती, ती त्याने विकून तिचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.
❮
❯