प्रेषितांचीं कृत्यें 7 : 1 (IRVMR)
स्तेफनाचे भाषण महायाजक म्हणाला, “या गोष्टी अशाच आहेत काय?”
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 2 (IRVMR)
तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका, आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्यास दर्शन दिले.”
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 3 (IRVMR)
व म्हटले, “तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 4 (IRVMR)
तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारान नगरात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मरण पावल्यावर देवाने त्यास तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 5 (IRVMR)
पण त्यामध्ये त्यास वतन दिले नाही, पाऊल भर देखील जमीन दिली नाही. त्यास मूलबाळ नसताही देवाने त्यास अभिवचन दिले की, हा देश तुला व तुझ्यामागे तुझ्या संततीला वतन असा देईल.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 6 (IRVMR)
देवाने आणखी असे सांगितले त्याची संतती परदेशात जाऊन काही काळ राहतील, आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे वाईटाने वागवतील.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 7 (IRVMR)
‘ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्यांचा न्याय मी करीन’ आणि त्यानंतर ते तेथून निघून ‘या स्थळी माझी उपासना करतील,’ असे देवाने म्हटले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 8 (IRVMR)
त्याने अब्राहामाला सुंतेचा करार लावून दिला हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला, त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 9 (IRVMR)
नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 10 (IRVMR)
त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले, आणि मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 11 (IRVMR)
मग सर्व मिसर: आणि कनान या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 12 (IRVMR)
तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबाने तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 13 (IRVMR)
मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 14 (IRVMR)
तेव्हा योसेफाने आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग, म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना बोलावून घेतले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 15 (IRVMR)
ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला; आणि तेथे तो, व आपले पूर्वजही मरण पावले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 16 (IRVMR)
त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 17 (IRVMR)
मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 18 (IRVMR)
योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 19 (IRVMR)
हाच राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत, म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 20 (IRVMR)
त्या काळात मोशेचा जन्म झाला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण तीन महिने पर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 21 (IRVMR)
मग त्यास बाहेर टाकून देण्यात आले असता, फारोच्या कन्येने त्यास घेउन आपला मुलगा म्हणून त्यास वाढवले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 22 (IRVMR)
मोशेला मिसरी लोकांचे सर्व ज्ञान शिकला; आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 23 (IRVMR)
मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 24 (IRVMR)
तेव्हा मोशेने इस्राएलातील कोणाएकावर अन्याय होत आहे, असे पाहून या जाचलेल्या मनुष्याचा कैवार घेतला आणि मिसऱ्याला मारून त्याचा सूड घेतला:
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 25 (IRVMR)
तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्यास वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 26 (IRVMR)
मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्राएली भांडत असता तो त्यांच्यापुढे आला व त्यांचा समेट करू लागला; तो म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही बांधव; आहात एकमेकांवर अन्याय का करता?’
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 27 (IRVMR)
तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 28 (IRVMR)
काल तू मिसऱ्याला ठार मारले, तसे मलाही मारायला पाहतोस काय?’
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 29 (IRVMR)
हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्यास दोन पुत्र झाले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 30 (IRVMR)
मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 31 (IRVMR)
मग मोशेने अग्निज्वालाचे दृष्य पाहिल्यावर, तो फार आश्चर्यचकित झाला; आणि हे दृष्य पाहण्यासाठी तो जवळ गेला, तेव्हा प्रभूची वाणी झाली की,
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 32 (IRVMR)
‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्यास तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 33 (IRVMR)
कारण प्रभूने त्यास म्हटले, ‘तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 34 (IRVMR)
मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 35 (IRVMR)
तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले, असे म्हणून, ‘ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते?’ त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 36 (IRVMR)
मिसर देशात, तांबड्या समुद्रात, व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 37 (IRVMR)
तोच मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवामधून, माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 38 (IRVMR)
रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 39 (IRVMR)
त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 40 (IRVMR)
ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील अशा देवता आम्हास करून दे. कारण ज्याने आम्हास मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, हे आम्हास कळत नाही.’
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 41 (IRVMR)
मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली, व तिच्यापुढे ‘यज्ञ करुन’ आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 42 (IRVMR)
तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय?
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 43 (IRVMR)
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 44 (IRVMR)
मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा म्हणजे पुजण्याकरता: तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हास बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.’ तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले, त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 45 (IRVMR)
जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली, त्यांचा देश आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणिला. आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 46 (IRVMR)
दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली; आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळविण्याची विनंती केली.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 47 (IRVMR)
आणि शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 48 (IRVMR)
तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हणले आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 49 (IRVMR)
प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 50 (IRVMR)
माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 51 (IRVMR)
अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या, लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला; सर्वदा विरोध करता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 52 (IRVMR)
ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्यास धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 53 (IRVMR)
अशा तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.”
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 54 (IRVMR)
स्तेफनाचा मृत्यू त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले, ते दातओठ खाऊ लागले.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 55 (IRVMR)
परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 56 (IRVMR)
आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 57 (IRVMR)
तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले;
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 58 (IRVMR)
मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली.
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 59 (IRVMR)
ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”
प्रेषितांचीं कृत्यें 7 : 60 (IRVMR)
मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
❮
❯