कलस्सैकरांस 4 : 1 (IRVMR)
कलस्सैकरांस 4 : 2 (IRVMR)
धन्यांनो, तुम्हांसही स्वर्गात धनी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रार्थना व रोजची वागणूक प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा.
कलस्सैकरांस 4 : 3 (IRVMR)
आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे.
कलस्सैकरांस 4 : 4 (IRVMR)
म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे.
कलस्सैकरांस 4 : 5 (IRVMR)
बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.
कलस्सैकरांस 4 : 6 (IRVMR)
तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.
कलस्सैकरांस 4 : 7 (IRVMR)
नमस्कार व समाप्ती माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील.
कलस्सैकरांस 4 : 8 (IRVMR)
मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे.
कलस्सैकरांस 4 : 9 (IRVMR)
मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यांतलाच आहे त्यालाही पाठवले आहे; ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील.
कलस्सैकरांस 4 : 10 (IRVMR)
माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.)
कलस्सैकरांस 4 : 11 (IRVMR)
युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.
कलस्सैकरांस 4 : 12 (IRVMR)
ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे रहावे.
कलस्सैकरांस 4 : 13 (IRVMR)
तुम्हासाठी व जे लावदीकियात व हेरापलीत आहेत त्याच्यांसाठी तो फार श्रम करीत आहे, अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो.
कलस्सैकरांस 4 : 14 (IRVMR)
प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात.
कलस्सैकरांस 4 : 15 (IRVMR)
लावदीकियातील बंधू आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम द्या.
कलस्सैकरांस 4 : 16 (IRVMR)
हे पत्र तुमच्यांत वाचून झाल्यावर की, लावदीकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावदीकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे.
कलस्सैकरांस 4 : 17 (IRVMR)
अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे.
कलस्सैकरांस 4 : 18 (IRVMR)
मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18