दानीएल 12 : 1 (IRVMR)
अंतसमय आणि मीखाएल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानांसाठी उभा असतो तो त्या समयी उभा राहील; आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळेपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय होईल; आणि त्या वेळेस तुझे लोक सोडवले जातील, प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल.
दानीएल 12 : 2 (IRVMR)
अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जीवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील.
दानीएल 12 : 3 (IRVMR)
जे सुज्ञ ते आकाशातील प्रकाशासारखे चकाकतील आणि जे पुष्काळास न्यायीपणाकडे वळवणारे सदासर्वदा ताऱ्याप्रमाणे चमकतील.
दानीएल 12 : 4 (IRVMR)
पण तू दानीएला, ही वचने आणि पुस्तकाचे रहस्य गुप्त ठेव, अगदी अंतसमयापर्यंत अनेक लोक इकडे तिकडे धावतील आणि ज्ञान वाढत जाईल.
दानीएल 12 : 5 (IRVMR)
मग मी दानीएलाने पाहिले आणि तिथे दोघे उभे होते एक नदीच्या या काठवर उभा होता आणि दुसरा पलीकडील काठावर उभा होता.
दानीएल 12 : 6 (IRVMR)
त्यापैकी एकाने तागाची वस्त्रे घातलेल्यास विचारले जो नदीच्या पाण्यावर होता या अद्भुत गोष्टीचा अंत होण्यास किती वेळ लागेल?
दानीएल 12 : 7 (IRVMR)
दानीएल 12 : 8 (IRVMR)
मी त्याची वाणी एकेली जो तागाची वस्त्रे घातलेला पुरुष नदीतल्या जलांच्या वरती होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशावर करून म्हटले, जो सदाजीवी आहे त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय आणि अर्धा समय, साडे तीन वर्ष जेव्हा पवित्रजनांच्या बलाचा चुराडा होईल तेव्हा हे पूर्ण करण्यात येईल. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले. मी ऐकले, पण मला समजले नाही तेव्हा मी विचारले, “माझ्या स्वामी, ह्याचा परिणाम काय?”
दानीएल 12 : 9 (IRVMR)
तो म्हणाला, दानीएला स्वस्थ रहा, कारण ही वचने मुद्रित करून अंतसमयापर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.
दानीएल 12 : 10 (IRVMR)
पुष्कळ शुध्द, स्वच्छ आणि पवित्र केले जातील पण दुष्ट दुष्टपणा करतील, दुष्टांपैकी कोणास समजणार नाही पण जे ज्ञानी ते समजतील.
दानीएल 12 : 11 (IRVMR)
रोजचे बलीहवन या वेळेपासून बंद करण्यात येईल आणि नाशदायी अमंगळाची स्थापना होईल तेव्हापासून 1, 290 दिवस लोटतील.
दानीएल 12 : 12 (IRVMR)
जो धीराने 1, 335 दिवस वाट पाहील तो धन्य.
दानीएल 12 : 13 (IRVMR)
तू आपल्या मार्गाने अंतापर्यंत जा, तू तुझे वतन प्राप्त करायला शेवटच्या दिवसात उठविला जाशील.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13