उपदेशक 7 : 1 (IRVMR)
{ज्ञानाची श्रेष्ठता} [PS] किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, [QBR] आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे. [QBR]
उपदेशक 7 : 2 (IRVMR)
मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा, [QBR] शोक करण्याऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे, [QBR] जिवंतांनी हे मनात बिंबवून ठेवावे. [QBR] म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील. [QBR]
उपदेशक 7 : 3 (IRVMR)
हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. [QBR] कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो. [QBR]
उपदेशक 7 : 4 (IRVMR)
शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते, [QBR] पण मूर्खाचे मन मेजवाणीच्या घरात असते. [QBR]
उपदेशक 7 : 5 (IRVMR)
मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा [QBR] शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे. [QBR]
उपदेशक 7 : 6 (IRVMR)
भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे [QBR] मूर्खाचे हसणे आहे. [QBR] हे सुद्धा व्यर्थच आहे. [QBR]
उपदेशक 7 : 7 (IRVMR)
पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते [QBR] आणि लाच मन भ्रष्ट करते. [QBR]
उपदेशक 7 : 8 (IRVMR)
एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे. [QBR] आणि आत्म्यात गर्विष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे. [QBR]
उपदेशक 7 : 9 (IRVMR)
तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. [QBR] कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो. [QBR]
उपदेशक 7 : 10 (IRVMR)
या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको. [QBR] कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही. [QBR]
उपदेशक 7 : 11 (IRVMR)
आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे. [QBR] ज्या कोणाला सूर्य दिसतो त्यांचा फायदा होतो. [QBR]
उपदेशक 7 : 12 (IRVMR)
कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते. [QBR] परंतु जो कोणी शहाणपणाने ज्ञान मिळवतो त्याचा फायदा हा आहे की, ते जीवन वाचविते.
उपदेशक 7 : 13 (IRVMR)
देवाच्या कृत्यांचा विचार कराः [QBR] जे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल? [QBR]
उपदेशक 7 : 14 (IRVMR)
जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा. [QBR] परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः [QBR] देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे. [QBR] या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये. [PE][PS]
उपदेशक 7 : 15 (IRVMR)
मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. [QBR] तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात, [QBR] आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात. [QBR]
उपदेशक 7 : 16 (IRVMR)
स्वनीतिमान होऊ नका, [QBR] स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. [QBR] तू आपल्या स्वतःचा नाश का करून घेतो? [QBR]
उपदेशक 7 : 17 (IRVMR)
दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका, [QBR] तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे? [QBR]
उपदेशक 7 : 18 (IRVMR)
तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे, [QBR] आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस. [QBR] जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल. [QBR]
उपदेशक 7 : 19 (IRVMR)
एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते, [QBR]
उपदेशक 7 : 20 (IRVMR)
जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही. [QBR] असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही. [QBR]
उपदेशक 7 : 21 (IRVMR)
बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका. [QBR] कारण तुमचा नोकर कदाचित तुम्हास शाप देताना ऐकाल. [QBR]
उपदेशक 7 : 22 (IRVMR)
त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे [QBR] तुम्ही सुध्दा इतरांना वारंवार शाप दिले आहेत. [PS]
उपदेशक 7 : 23 (IRVMR)
{ज्ञानाचा शोध} [PS] मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो, [QBR] मी ज्ञानी होईन, [QBR] परंतु ते माझ्यापासून दूरच राहिले होते. [QBR]
उपदेशक 7 : 24 (IRVMR)
ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल? [QBR]
उपदेशक 7 : 25 (IRVMR)
मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले. [QBR] आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले, [QBR] आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. [QBR] आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे. [QBR]
उपदेशक 7 : 26 (IRVMR)
मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली, [QBR] तिचे हृदय पूर्ण पाश व जाळी आहे, [QBR] आणि तिचे बाहू साखळ्यांसारखे आहेत. [QBR] जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसटतो. [QBR] पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो. [PE][PS]
उपदेशक 7 : 27 (IRVMR)
मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.
उपदेशक 7 : 28 (IRVMR)
मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही. [PE][PS]
उपदेशक 7 : 29 (IRVMR)
मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे. [PE]
❮
❯