उपदेशक 7 : 1 (IRVMR)
ज्ञानाची श्रेष्ठता किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे.
उपदेशक 7 : 2 (IRVMR)
मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा, शोक करण्याऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे, जिवंतांनी हे मनात बिंबवून ठेवावे. म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील.
उपदेशक 7 : 3 (IRVMR)
हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो.
उपदेशक 7 : 4 (IRVMR)
शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते, पण मूर्खाचे मन मेजवाणीच्या घरात असते.
उपदेशक 7 : 5 (IRVMR)
मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे.
उपदेशक 7 : 6 (IRVMR)
भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे मूर्खाचे हसणे आहे. हे सुद्धा व्यर्थच आहे.
उपदेशक 7 : 7 (IRVMR)
पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते आणि लाच मन भ्रष्ट करते.
उपदेशक 7 : 8 (IRVMR)
एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे. आणि आत्म्यात गर्विष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे.
उपदेशक 7 : 9 (IRVMR)
तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो.
उपदेशक 7 : 10 (IRVMR)
या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको. कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही.
उपदेशक 7 : 11 (IRVMR)
आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे. ज्या कोणाला सूर्य दिसतो त्यांचा फायदा होतो.
उपदेशक 7 : 12 (IRVMR)
कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते. परंतु जो कोणी शहाणपणाने ज्ञान मिळवतो त्याचा फायदा हा आहे की, ते जीवन वाचविते.
उपदेशक 7 : 13 (IRVMR)
देवाच्या कृत्यांचा विचार कराः जे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?
उपदेशक 7 : 14 (IRVMR)
जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा. परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे. या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये.
उपदेशक 7 : 15 (IRVMR)
मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात, आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात.
उपदेशक 7 : 16 (IRVMR)
स्वनीतिमान होऊ नका, स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. तू आपल्या स्वतःचा नाश का करून घेतो?
उपदेशक 7 : 17 (IRVMR)
दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका, तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?
उपदेशक 7 : 18 (IRVMR)
तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे, आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस. जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल.
उपदेशक 7 : 19 (IRVMR)
एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते,
उपदेशक 7 : 20 (IRVMR)
जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही. असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही.
उपदेशक 7 : 21 (IRVMR)
बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका. कारण तुमचा नोकर कदाचित तुम्हास शाप देताना ऐकाल.
उपदेशक 7 : 22 (IRVMR)
त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे तुम्ही सुध्दा इतरांना वारंवार शाप दिले आहेत.
उपदेशक 7 : 23 (IRVMR)
ज्ञानाचा शोध मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो, मी ज्ञानी होईन, परंतु ते माझ्यापासून दूरच राहिले होते.
उपदेशक 7 : 24 (IRVMR)
ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल?
उपदेशक 7 : 25 (IRVMR)
मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले. आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले, आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे.
उपदेशक 7 : 26 (IRVMR)
मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली, तिचे हृदय पूर्ण पाश व जाळी आहे, आणि तिचे बाहू साखळ्यांसारखे आहेत. जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसटतो. पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो.
उपदेशक 7 : 27 (IRVMR)
मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.
उपदेशक 7 : 28 (IRVMR)
मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही.
उपदेशक 7 : 29 (IRVMR)
मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29