इफिसकरांस 1 : 1 (IRVMR)
इफिस शहरातील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे यांना, देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित, पौल याच्याकडून
इफिसकरांस 1 : 2 (IRVMR)
देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो.
इफिसकरांस 1 : 3 (IRVMR)
ईशस्तवन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.
इफिसकरांस 1 : 4 (IRVMR)
देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे.
इफिसकरांस 1 : 5 (IRVMR)
देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली.
इफिसकरांस 1 : 6 (IRVMR)
त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली.
इफिसकरांस 1 : 7 (IRVMR)
त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
इफिसकरांस 1 : 8 (IRVMR)
देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे.
इफिसकरांस 1 : 9 (IRVMR)
देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली.
इफिसकरांस 1 : 10 (IRVMR)
देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणील.
इफिसकरांस 1 : 11 (IRVMR)
देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो,
इफिसकरांस 1 : 12 (IRVMR)
ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली.
इफिसकरांस 1 : 13 (IRVMR)
ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.
इफिसकरांस 1 : 14 (IRVMR)
त्याच्या प्रियजनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी.
इफिसकरांस 1 : 15 (IRVMR)
देवज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना म्हणून तुमच्यामधील असलेला प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्रजनांवरची प्रीती विषयी ऐकून
इफिसकरांस 1 : 16 (IRVMR)
मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही.
इफिसकरांस 1 : 17 (IRVMR)
मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
इफिसकरांस 1 : 18 (IRVMR)
म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे,
इफिसकरांस 1 : 19 (IRVMR)
आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तीशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे.
इफिसकरांस 1 : 20 (IRVMR)
ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेले देवाचे सामर्थ्य त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले.
इफिसकरांस 1 : 21 (IRVMR)
त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले.
इफिसकरांस 1 : 22 (IRVMR)
देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्यास सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले.
इफिसकरांस 1 : 23 (IRVMR)
हेच ख्रिस्ताचे शरीर. जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ते भरलेले आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23