निर्गम 24 : 1 (IRVMR)
कराराचे रक्त मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलापैकी सत्तरजण असे मिळून परमेश्वराकडे पर्वतावर चढून येऊन त्यास दुरूनच नमन करा;
निर्गम 24 : 2 (IRVMR)
मग मोशेने एकट्यानेच परमेश्वराजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”
निर्गम 24 : 3 (IRVMR)
मोशेने लोकांस परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एका आवाजात म्हणाले, “परमेश्वराने जी वचने सांगितलेली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू.”
निर्गम 24 : 4 (IRVMR)
तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली, मोशेने पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले.
निर्गम 24 : 5 (IRVMR)
मग मोशेने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना परमेश्वरास होमबली व बैलाची शांत्यर्पणे अर्पण करायला पाठवले.
निर्गम 24 : 6 (IRVMR)
मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे रक्त त्याने वेदीवर शिंपडले.
निर्गम 24 : 7 (IRVMR)
मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांस वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, “परमेश्वराने सांगितले आहे तसे आम्ही करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.”
निर्गम 24 : 8 (IRVMR)
मग मोशेने रक्त घेऊन लोकांवर शिंपडले. तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी या वचनाप्रमाणे करार केला आहे असे हे त्या कराराचे रक्त आहे.”
निर्गम 24 : 9 (IRVMR)
नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.
निर्गम 24 : 10 (IRVMR)
तेथे त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; इंद्रनीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ होते
निर्गम 24 : 11 (IRVMR)
इस्राएलातील वडिलधाऱ्या मनुष्यांनी देवाला पाहिले, परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.
निर्गम 24 : 12 (IRVMR)
सीनाय पर्वतावर मोशे परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”
निर्गम 24 : 13 (IRVMR)
तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला.
निर्गम 24 : 14 (IRVMR)
मोशे इस्राएलांच्या वडिलांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच थांबा, मी परत येईपर्यंत अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”
निर्गम 24 : 15 (IRVMR)
मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला;
निर्गम 24 : 16 (IRVMR)
परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वराने मोशेला हाक मारली.
निर्गम 24 : 17 (IRVMR)
इस्राएल लोकांस पर्वताच्या शिखरावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते.
निर्गम 24 : 18 (IRVMR)
मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18