निर्गम 27 : 1 (IRVMR)
होमवेदी
निर्ग. 38:1-7 परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.
निर्गम 27 : 2 (IRVMR)
वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे अंगचीच बनलेली असावी; मग वेदी पितळेने मढवावी.
निर्गम 27 : 3 (IRVMR)
वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.
निर्गम 27 : 4 (IRVMR)
तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.
निर्गम 27 : 5 (IRVMR)
ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखाली, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
निर्गम 27 : 6 (IRVMR)
वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.
निर्गम 27 : 7 (IRVMR)
ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
निर्गम 27 : 8 (IRVMR)
वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंना फळ्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
निर्गम 27 : 9 (IRVMR)
निवासमंडपाचे अंगण
निर्ग. 38:9-20 निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी.
निर्गम 27 : 10 (IRVMR)
तिच्याकरता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत.
निर्गम 27 : 11 (IRVMR)
वेदीच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
निर्गम 27 : 12 (IRVMR)
अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.
निर्गम 27 : 13 (IRVMR)
अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पन्नास हात असावी.
निर्गम 27 : 14 (IRVMR)
अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीची पडद्याची कनात असावी; या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;
निर्गम 27 : 15 (IRVMR)
फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही पंधरा हात लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे.
निर्गम 27 : 16 (IRVMR)
अंगणाच्या फाटकासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वीस हात लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीदार विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.
निर्गम 27 : 17 (IRVMR)
अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
निर्गम 27 : 18 (IRVMR)
अंगणाची लांबी शंभर हात असावी व पन्नास हात रुंद असावी; अंगणासभोवतीची पडद्याची कनात पाच हात उंच असावी व ती कातलेल्या तलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
निर्गम 27 : 19 (IRVMR)
पवित्र निवासमंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणासभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.
निर्गम 27 : 20 (IRVMR)
दिव्यासाठी तेल
लेवी. 24:1-3 इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे हाताने कुटलेले निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे;
निर्गम 27 : 21 (IRVMR)
अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शनमंडपामध्ये अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21