निर्गम 33 : 1 (IRVMR)
वचनदत्त देशाकडे जाण्याची आज्ञा मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
निर्गम 33 : 2 (IRVMR)
तुमच्यापुढे चालण्यासाठी मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांस तेथून घालवून देईन.
निर्गम 33 : 3 (IRVMR)
दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हास नष्ट करीन.”
निर्गम 33 : 4 (IRVMR)
ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;
निर्गम 33 : 5 (IRVMR)
कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”
निर्गम 33 : 6 (IRVMR)
म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यांवाचून राहिले.
निर्गम 33 : 7 (IRVMR)
दर्शनमंडप मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई.
निर्गम 33 : 8 (IRVMR)
ज्या वेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्या वेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत.
निर्गम 33 : 9 (IRVMR)
जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
निर्गम 33 : 10 (IRVMR)
जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
निर्गम 33 : 11 (IRVMR)
मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
निर्गम 33 : 12 (IRVMR)
परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वसन मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.
निर्गम 33 : 13 (IRVMR)
आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.”
निर्गम 33 : 14 (IRVMR)
परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.”
निर्गम 33 : 15 (IRVMR)
मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस.
निर्गम 33 : 16 (IRVMR)
तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?”
निर्गम 33 : 17 (IRVMR)
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
निर्गम 33 : 18 (IRVMR)
नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
निर्गम 33 : 19 (IRVMR)
मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण* महिमा तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन.
निर्गम 33 : 20 (IRVMR)
परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.”
निर्गम 33 : 21 (IRVMR)
परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.
निर्गम 33 : 22 (IRVMR)
माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;
निर्गम 33 : 23 (IRVMR)
नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23