निर्गम 40 : 1 (IRVMR)
निवासमंडप उभारणे आणि त्याचे पवित्रीकरण मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
निर्गम 40 : 2 (IRVMR)
“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
निर्गम 40 : 3 (IRVMR)
साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.
निर्गम 40 : 4 (IRVMR)
मग मेज आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
निर्गम 40 : 5 (IRVMR)
साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.
निर्गम 40 : 6 (IRVMR)
दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.
निर्गम 40 : 7 (IRVMR)
दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यामध्ये पाणी भर.
निर्गम 40 : 8 (IRVMR)
सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.
निर्गम 40 : 9 (IRVMR)
अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याच्या सर्व वस्तू पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.
निर्गम 40 : 10 (IRVMR)
होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल.
निर्गम 40 : 11 (IRVMR)
गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.
निर्गम 40 : 12 (IRVMR)
अहरोन व त्याचे पुत्र ह्याना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.
निर्गम 40 : 13 (IRVMR)
अहरोनाला पवित्र वस्रे घाल व त्यास तेलाने अभिषेक करून पवित्र कर, मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.
निर्गम 40 : 14 (IRVMR)
त्याच्या पुत्रांनाजवळ बोलावून अंगरखे घाल.
निर्गम 40 : 15 (IRVMR)
त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
निर्गम 40 : 16 (IRVMR)
मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले.
निर्गम 40 : 17 (IRVMR)
दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली.
निर्गम 40 : 18 (IRVMR)
परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळ्या लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;
निर्गम 40 : 19 (IRVMR)
त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
निर्गम 40 : 20 (IRVMR)
मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.
निर्गम 40 : 21 (IRVMR)
त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
निर्गम 40 : 22 (IRVMR)
मोशेने पवित्र निवासमंडपाच्या उत्तर बाजूला दर्शनमंडपामध्ये पडद्याच्या बाहेर मेज ठेवले;
निर्गम 40 : 23 (IRVMR)
त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
निर्गम 40 : 24 (IRVMR)
त्याने पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपामध्ये मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.
निर्गम 40 : 25 (IRVMR)
नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
निर्गम 40 : 26 (IRVMR)
त्याने दर्शनमंडपामध्ये अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.
निर्गम 40 : 27 (IRVMR)
नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
निर्गम 40 : 28 (IRVMR)
त्याने पवित्र निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.
निर्गम 40 : 29 (IRVMR)
त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
निर्गम 40 : 30 (IRVMR)
त्याने दर्शनमंडप आणि वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यामध्ये पाणी भरले.
निर्गम 40 : 31 (IRVMR)
मोशे, अहरोन व अहरोनाचे पुत्र त्यामध्ये आपआपले हातपाय धूत असत;
निर्गम 40 : 32 (IRVMR)
ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
निर्गम 40 : 33 (IRVMR)
त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकाला पडदा लावला; या प्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.
निर्गम 40 : 34 (IRVMR)
दर्शनमंडपावरील परमेश्वराची महिमा दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
निर्गम 40 : 35 (IRVMR)
दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
निर्गम 40 : 36 (IRVMR)
पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत;
निर्गम 40 : 37 (IRVMR)
परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
निर्गम 40 : 38 (IRVMR)
परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38