{यरूशलेम जणू निरुपयोगी द्राक्षलता} [PS] नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला
यहेज्केल 15 : 2 (IRVMR)
मानवाच्या मुला वनवृक्षाची इतर झाडे त्याच्या फांद्या ह्यांच्या तुलनेत द्राक्षाच्या झाडाची काय श्रेष्ठता आहे?
यहेज्केल 15 : 3 (IRVMR)
तिचे लाकुड घेऊन काही तरी करण्याच्या उपयोगास पडते काय? किंवा त्यावर काही लटकवण्यासाठी खुंटी म्हणून उपयोगात आणतात काय?
यहेज्केल 15 : 4 (IRVMR)
बघा जर ती आगीत इंधन म्हणून उपयोगात आणली नाही. तर अग्नीने जाळून भस्म झाल्यावर उपयोगी वस्तू बनवीण्यास कोणत्याच उपयोगात राहत नाही.
यहेज्केल 15 : 5 (IRVMR)
पाहा ती चांगली असता कोणत्याच उपयोगाची नाही. जळाल्यावरही कोणत्याही कामाची राहणार नाही.
यहेज्केल 15 : 6 (IRVMR)
प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो की, वनवृक्षातील न आवडते द्राक्षाचे झाड मी आग्नीने जाळून टाकीन त्याच प्रमाणे यरूशलेम निवासी त्यांच्याशी मी तोच व्यवहार करेन.
यहेज्केल 15 : 7 (IRVMR)
मी माझे मुख त्यांच्या दृष्टीआड करेन, जरी ते आग्नीतून बचावतील तरी अग्नी त्यास भस्म करेल. मी त्यांच्या दृष्टीआड होईल तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे.
यहेज्केल 15 : 8 (IRVMR)
मी देश ओसाड नापीक करेन कारण ते पापकर्मे करीतात असे प्रभू परमेश्वर देव म्हणतो. [PE]