यहेज्केल 18 : 1 (IRVMR)
पाप करणारा जीवात्मा मरेल पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
यहेज्केल 18 : 2 (IRVMR)
“वडीलांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,” याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू ज्या म्हणी वापरतो आणि म्हणतो.
यहेज्केल 18 : 3 (IRVMR)
मी शपथ घेतो, “हे परमेश्वर देव जाहीर करतोय” निश्चितच इस्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही.
यहेज्केल 18 : 4 (IRVMR)
पाहा! सर्व जीव आत्मे माझे आहेत, जे पित्यापासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे जो पुरुष पाप करेल तो मरेल.
यहेज्केल 18 : 5 (IRVMR)
जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतिने वागणारा आहे.
यहेज्केल 18 : 6 (IRVMR)
जर त्यास पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि त्याने आपले डोळे वर इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात स्त्रीकडे गेला नाही.
यहेज्केल 18 : 7 (IRVMR)
जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही, पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्न लोकांना कपडे घातली.
यहेज्केल 18 : 8 (IRVMR)
त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले व लोकांमध्ये विश्वासूपण निर्माण केला.
यहेज्केल 18 : 9 (IRVMR)
जर तो माझ्या दर्ज्याने चालेल आणि माझे फर्मान विश्वासूपणे वागण्यात पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेल; तो जगेल, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
यहेज्केल 18 : 10 (IRVMR)
पण त्याला जर रक्तपात रागीट मुलगा असला व ही सर्व कामे त्याने केली,
यहेज्केल 18 : 11 (IRVMR)
त्याच्या वडिलाने यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्य पदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले.
यहेज्केल 18 : 12 (IRVMR)
त्याने गरजू व गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले परत केले नाही, जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले.
यहेज्केल 18 : 13 (IRVMR)
जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झडा त्याच्याच माथी येईल.
यहेज्केल 18 : 14 (IRVMR)
पण पाहा! त्यास पुत्र झाला व त्याने आपल्या वडिलाने केलेले पातक पाहिले आणि स्वत: देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही,
यहेज्केल 18 : 15 (IRVMR)
जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही व आपले डोळे इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाहीत आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही.
यहेज्केल 18 : 16 (IRVMR)
जर त्याने कुणावरही दड्पशाही केली नाही, जप्ती, तारण म्हणून काही ठेवून घेतले किंवा चोरलेल्या वस्तू ठेवून घेतल्या नाहीत, पण त्याऐवजी त्याने भुकेलेल्या व्यक्तीस अन्न दिले आणि नग्न व्यक्तीस वस्त्र दिले.
यहेज्केल 18 : 17 (IRVMR)
गरीबांना नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतले नाही व अन्यायाने नफा घेतला नाही, त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्जानुसार चालला, तर तो आपल्या वडिलाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चित जगेल.
यहेज्केल 18 : 18 (IRVMR)
त्याच्या वडिलाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पाहा! तो आपल्या अधर्मामुळे मरेल.
यहेज्केल 18 : 19 (IRVMR)
पण तू म्हणतोस “वडिलाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला व नीतिने वागला आणि त्याने माझे सर्व नियम पाळले; त्याने त्याची कृती केली, तो निश्चित जगेल.
यहेज्केल 18 : 20 (IRVMR)
जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.
यहेज्केल 18 : 21 (IRVMR)
देवाचा मार्ग न्याय्य आहे पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
यहेज्केल 18 : 22 (IRVMR)
सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतीच्या सरावाने जगेल.
यहेज्केल 18 : 23 (IRVMR)
“मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहीर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?
यहेज्केल 18 : 24 (IRVMR)
जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही. जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.
यहेज्केल 18 : 25 (IRVMR)
पण तू म्हणतोस, “प्रभूचे मार्ग योग्य नाहीत,” इस्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?
यहेज्केल 18 : 26 (IRVMR)
जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासून आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल याचे कारण तोच ठरेल, आणि त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल.
यहेज्केल 18 : 27 (IRVMR)
पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने व नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.
यहेज्केल 18 : 28 (IRVMR)
कारण त्याने पाहिले व केलेल्या दुष्कर्मापासून तो वळाला, तो जगेल तो मरणार नाही.
यहेज्केल 18 : 29 (IRVMR)
पण इस्राएलाचे घराणे म्हणते, “प्रभूचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वत:चे मार्ग कसे अयोग्य नाही?”
यहेज्केल 18 : 30 (IRVMR)
तथापि “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.
यहेज्केल 18 : 31 (IRVMR)
तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
यहेज्केल 18 : 32 (IRVMR)
कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे परमेश्वर देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित राहा.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32