गलतीकरांस 6 : 1 (IRVMR)
व्यवहारोपयोगी बोध बंधूंनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्यास सौम्यतेच्या आत्म्याने पुनःस्थापित आणा; तू स्वतःही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.
गलतीकरांस 6 : 2 (IRVMR)
तुम्ही एकमेकांची ओझी वाहा म्हणजे अशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.
गलतीकरांस 6 : 3 (IRVMR)
कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो.
गलतीकरांस 6 : 4 (IRVMR)
पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग, त्यास दुसर्याच्या संबंधात नाही, पण केवळ आपल्यात अभिमानाला जागा मिळेल.
गलतीकरांस 6 : 5 (IRVMR)
कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.
गलतीकरांस 6 : 7 (IRVMR)
ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणार्याला सर्व प्रकारच्या चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल.
गलतीकरांस 6 : 8 (IRVMR)
कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.
गलतीकरांस 6 : 9 (IRVMR)
आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू.
गलतीकरांस 6 : 10 (IRVMR)
म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे.
गलतीकरांस 6 : 11 (IRVMR)
समाप्ती पाहा, किती मोठ्या अक्षरात, मी तुम्हास स्वतःच्या हाताने लिहित आहे.
गलतीकरांस 6 : 12 (IRVMR)
जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुंता करून घेण्यास भाग पाडतात;
गलतीकरांस 6 : 13 (IRVMR)
कारण ज्यांची सुंता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी, म्हणून, तुमची सुंता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात.
गलतीकरांस 6 : 14 (IRVMR)
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.
गलतीकरांस 6 : 15 (IRVMR)
कारण सुंता होण्यात किंवा सुंता न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय.
गलतीकरांस 6 : 16 (IRVMR)
आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.
गलतीकरांस 6 : 18 (IRVMR)
आतापासून कोणी मला त्रास देऊ नये, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण केल्या आहेत. बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18