उत्पत्ति 10 : 1 (IRVMR)
नोहाच्या मुलांचे वंशज
1 इति. 1:5-27 नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.
उत्पत्ति 10 : 2 (IRVMR)
याफेथाचे पुत्र* वंशावळी गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
उत्पत्ति 10 : 3 (IRVMR)
गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ व तोगार्मा हे होते.
उत्पत्ति 10 : 4 (IRVMR)
यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते.
उत्पत्ति 10 : 5 (IRVMR)
यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.
उत्पत्ति 10 : 6 (IRVMR)
हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते.
उत्पत्ति 10 : 7 (IRVMR)
कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते.
उत्पत्ति 10 : 8 (IRVMR)
कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.
उत्पत्ति 10 : 9 (IRVMR)
तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे.
उत्पत्ति 10 : 10 (IRVMR)
त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल† बाबेलोन , एरक, अक्काद व कालने ही होती.
उत्पत्ति 10 : 11 (IRVMR)
त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली
उत्पत्ति 10 : 12 (IRVMR)
आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे.
उत्पत्ति 10 : 13 (IRVMR)
मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
उत्पत्ति 10 : 14 (IRVMR)
पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले), व कफतोरीम, ह्यांचा पिता बनला.
उत्पत्ति 10 : 15 (IRVMR)
कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,
उत्पत्ति 10 : 16 (IRVMR)
तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
उत्पत्ति 10 : 18 (IRVMR)
अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली.
उत्पत्ति 10 : 19 (IRVMR)
कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.
उत्पत्ति 10 : 20 (IRVMR)
कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते.
उत्पत्ति 10 : 21 (IRVMR)
शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.
उत्पत्ति 10 : 22 (IRVMR)
शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते.
उत्पत्ति 10 : 23 (IRVMR)
अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते.
उत्पत्ति 10 : 24 (IRVMR)
अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला.
उत्पत्ति 10 : 25 (IRVMR)
एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
उत्पत्ति 10 : 26 (IRVMR)
यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह
उत्पत्ति 10 : 29 (IRVMR)
ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.
उत्पत्ति 10 : 30 (IRVMR)
त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफर प्रदेशापर्यंत होता.
उत्पत्ति 10 : 31 (IRVMR)
आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र.
उत्पत्ति 10 : 32 (IRVMR)
पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32