उत्पत्ति 35 : 1 (IRVMR)
{बेथेल येथे देव याकोबाला आशीर्वाद देतो} [PS] देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”
उत्पत्ति 35 : 2 (IRVMR)
तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला.
उत्पत्ति 35 : 3 (IRVMR)
नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
उत्पत्ति 35 : 4 (IRVMR)
तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हातातले सर्व परके देव आणि आपल्या कानातील कुंडलेही आणून याकोबाला दिली. तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नगराजवळील एला झाडाच्या खाली पुरून टाकल्या.
उत्पत्ति 35 : 5 (IRVMR)
ते तेथून निघाले, त्यांच्या सभोवतालच्या नगरावर देवाने भीती उत्पन्न केली, म्हणून त्यांनी याकोबाच्या मुलांचा पाठलाग केला नाही.
उत्पत्ति 35 : 6 (IRVMR)
अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात.
उत्पत्ति 35 : 7 (IRVMR)
त्याने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल-बेथेल [* अर्थ-बेथेलचा देव ] ” असे ठेवले. कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना याच जागी प्रथम देवाने त्यास दर्शन दिले होते.
उत्पत्ति 35 : 8 (IRVMR)
रिबकेची दाई दबोरा या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे अल्लोन झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ म्हणजे रडण्याचे अल्लोन असे ठेवले.
उत्पत्ति 35 : 9 (IRVMR)
याकोब पदन-अराम येथून परत आला, तेव्हा देवाने त्यास पुन्हा दर्शन दिले आणि त्यास आशीर्वाद दिला.
उत्पत्ति 35 : 10 (IRVMR)
देव त्यास म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे, परंतु तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे होईल.” म्हणून देवाने त्यास इस्राएल हे नाव दिले.
उत्पत्ति 35 : 11 (IRVMR)
देव त्यास म्हणाला, “मी सर्व सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप आणि बहुगुणित हो. तुझ्यातून एक राष्ट्र आणि राष्ट्रांचा समुदाय येईल व तुझ्या वंशजातून राजे जन्मास येतील.
उत्पत्ति 35 : 12 (IRVMR)
मी अब्राहाम व इसहाक यांना जो देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.”
उत्पत्ति 35 : 13 (IRVMR)
मग देव ज्या ठिकाणी त्याच्याशी बोलला तेथूनच वर निघून गेला.
उत्पत्ति 35 : 14 (IRVMR)
मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण व तेल ओतले.
उत्पत्ति 35 : 15 (IRVMR)
जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले. [PS]
उत्पत्ति 35 : 16 (IRVMR)
{राहेलीचा मृत्यू} [PS] मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या.
उत्पत्ति 35 : 17 (IRVMR)
राहेलीस प्रसूतीवेदनांचा अतिशय त्रास होत असताना, राहेलीची सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच होईल.”
उत्पत्ति 35 : 18 (IRVMR)
त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेन [† अर्थ-माझ्या दुःखाचा पुत्र] ओनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन [‡ अर्थ-माझ्या शक्तीचा पुत्र] असे ठेवले.
उत्पत्ति 35 : 19 (IRVMR)
राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गावास जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले.
उत्पत्ति 35 : 20 (IRVMR)
आणि याकोबाने तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक स्तंभ उभा केला. तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे.
उत्पत्ति 35 : 21 (IRVMR)
त्यानंतर इस्राएल पुढे गेला आणि मिगदाल-एदेरच्या पलीकडे त्याने तळ दिला.
उत्पत्ति 35 : 22 (IRVMR)
इस्राएल त्या देशात राहत होता, त्या वेळी रऊबेन, आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला, हे इस्राएलाने ऐकले. याकोबाला बारा पुत्र होते. 1 इति. 2:1-2 [PE][PS]
उत्पत्ति 35 : 23 (IRVMR)
{याकोबाचे पुत्र} [PS] त्यास लेआपासून झालेले पुत्र: याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.
उत्पत्ति 35 : 24 (IRVMR)
त्यास राहेलीपासून झालेले पुत्र: योसेफ व बन्यामीन.
उत्पत्ति 35 : 25 (IRVMR)
त्यास राहेलीची दासी बिल्हापासून झालेले पुत्र: दान व नफताली.
उत्पत्ति 35 : 26 (IRVMR)
आणि लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र गाद व आशेर. हे सर्व याकोबाचे पुत्र जे त्यास पदन-अरामात झाले.
उत्पत्ति 35 : 27 (IRVMR)
याकोब मग किर्याथ-आर्बा (म्हणजे हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे आला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते. [PS]
उत्पत्ति 35 : 28 (IRVMR)
{इसहाकाचा मृत्यू} [PS] इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला.
उत्पत्ति 35 : 29 (IRVMR)
इसहाकाने शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला, आणि आपल्या पूर्वजास मिळाला, तो म्हातारा व आयुष्याचे पूर्ण दिवस होऊन मरण पावला. त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्यास पुरले. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: