उत्पत्ति 36 : 1 (IRVMR)
{एसावाची वंशावळ} [PS] एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ ही,
उत्पत्ति 36 : 2 (IRVMR)
एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा
उत्पत्ति 36 : 3 (IRVMR)
आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
उत्पत्ति 36 : 4 (IRVMR)
एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.
उत्पत्ति 36 : 5 (IRVMR)
आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे पुत्र त्यास कनान देशात झाले.
उत्पत्ति 36 : 6 (IRVMR)
एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.
उत्पत्ति 36 : 7 (IRVMR)
कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यामध्ये त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.
उत्पत्ति 36 : 8 (IRVMR)
एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात.
उत्पत्ति 36 : 9 (IRVMR)
सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ:
उत्पत्ति 36 : 10 (IRVMR)
एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल.
उत्पत्ति 36 : 11 (IRVMR)
अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज.
उत्पत्ति 36 : 12 (IRVMR)
अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती.
उत्पत्ति 36 : 13 (IRVMR)
रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती.
उत्पत्ति 36 : 14 (IRVMR)
सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.
उत्पत्ति 36 : 15 (IRVMR)
एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज,
उत्पत्ति 36 : 16 (IRVMR)
कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.
उत्पत्ति 36 : 17 (IRVMR)
एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.
उत्पत्ति 36 : 18 (IRVMR)
एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.
उत्पत्ति 36 : 19 (IRVMR)
हे एसावाचे पुत्र होते, आणि हे त्यांचे वंश होते. 1 इति. 1:38-42 [PE][PS]
उत्पत्ति 36 : 20 (IRVMR)
{सेईराचे वंशज} [PS] त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
उत्पत्ति 36 : 21 (IRVMR)
दीशोन, एसर व दिशान. हे अदोम देशात सेईराचे पुत्र होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले.
उत्पत्ति 36 : 22 (IRVMR)
लोटानाचे पुत्र होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती.
उत्पत्ति 36 : 23 (IRVMR)
शोबालाचे पुत्र: अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
उत्पत्ति 36 : 24 (IRVMR)
सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे [* किंवा जंगली गाढवे] सापडले तोच हा अना.
उत्पत्ति 36 : 25 (IRVMR)
अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
उत्पत्ति 36 : 26 (IRVMR)
दीशोनाचे हे पुत्र होते: हेम्दान, एश्बान, यित्रान व करान.
उत्पत्ति 36 : 27 (IRVMR)
एसराला बिल्हान, जावान व अकान हे पुत्र होते.
उत्पत्ति 36 : 28 (IRVMR)
दीशानाला ऊस व अरान हे पुत्र होते.
उत्पत्ति 36 : 29 (IRVMR)
होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
उत्पत्ति 36 : 30 (IRVMR)
दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले. 1 इति. 1:43-54 [PE][PS]
उत्पत्ति 36 : 31 (IRVMR)
{अदोम देशाचे राजे} [PS] इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच:
उत्पत्ति 36 : 32 (IRVMR)
बौराचा मुलगा बेला याने अदोमावर राज्य केले, आणि त्याच्या नगराचे नाव दिन्हाबा होते.
उत्पत्ति 36 : 33 (IRVMR)
बेला मरण पावल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले.
उत्पत्ति 36 : 34 (IRVMR)
योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने राज्य केले.
उत्पत्ति 36 : 35 (IRVMR)
हुशाम मरण पावल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते.
उत्पत्ति 36 : 36 (IRVMR)
हदाद मरण पावल्यावर मास्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.
उत्पत्ति 36 : 37 (IRVMR)
साम्ला मरण पावल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.
उत्पत्ति 36 : 38 (IRVMR)
शौल मरण पावल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले.
उत्पत्ति 36 : 39 (IRVMR)
बाल-हानान मरण पावल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.
उत्पत्ति 36 : 40 (IRVMR)
एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे: तिम्ना, आल्वा, यतेथ,
उत्पत्ति 36 : 41 (IRVMR)
अहलीबामा, एला, पीनोन,
उत्पत्ति 36 : 42 (IRVMR)
कनाज, तेमान, मिब्सार,
उत्पत्ति 36 : 43 (IRVMR)
माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: