उत्पत्ति 49 : 1 (IRVMR)
{आपल्या मुलांविषयी याकोबाने केलेले भाकीत} [PS] त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.” [QBR]
उत्पत्ति 49 : 2 (IRVMR)
“याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका, [QBR] तुमचा बाप इस्राएल याचे ऐका. [QBR]
उत्पत्ति 49 : 3 (IRVMR)
रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस, [QBR] तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस. [QBR]
उत्पत्ति 49 : 4 (IRVMR)
परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत. [QBR] कारण तू आपल्या वडिलाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास.” [QBR]
उत्पत्ति 49 : 5 (IRVMR)
“शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत. [QBR] या दोन भावांना तलवारीने लढण्याची आवड आहे. [QBR]
उत्पत्ति 49 : 6 (IRVMR)
माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको; [QBR] त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत. [QBR] त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली. [QBR] आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या. [QBR]
उत्पत्ति 49 : 7 (IRVMR)
त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात. [QBR] तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन, [QBR] ते सर्व इस्राएल देशभर पसरतील. [QBR]
उत्पत्ति 49 : 8 (IRVMR)
यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. [QBR] तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. [QBR] तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील. [QBR]
उत्पत्ति 49 : 9 (IRVMR)
यहूदा सिंहाचा छावा आहे. [QBR] माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे, [QBR] तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा [* मोठ्या सिंहासारखा ] दबा धरून बसला आहे. [QBR] त्यास उठवण्याचे धाडस कोण करील? [QBR]
उत्पत्ति 49 : 10 (IRVMR)
शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही, [QBR] किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही. [QBR] राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील [† किंवा ज्याच्या मालकीचे आहे तो येईपर्यंत] . [QBR]
उत्पत्ति 49 : 11 (IRVMR)
तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस, [QBR] आणि त्याचे शिंगरु खास द्राक्षवेलीस बांधेल. [QBR] त्याने त्याचे वस्त्र द्राक्षरसात आणि आपला झगा द्राक्षांच्या रक्तात धुतला आहे. [QBR]
उत्पत्ति 49 : 12 (IRVMR)
त्याचे डोळे द्राक्षरसापेक्षा अधिक लालबुंद होतील. [QBR] त्याचे दात दूधापेक्षा अधिक सफेद होतील. [QBR]
उत्पत्ति 49 : 13 (IRVMR)
जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल. [QBR] त्याच्या जमिनीची हद्द सीदोन नगरापर्यंत असेल.” [QBR2]
उत्पत्ति 49 : 14 (IRVMR)
“इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये [‡ मेंढ्यांच्या दोन समूहाच्या मध्ये ] दबून बसला आहे. [QBR]
उत्पत्ति 49 : 15 (IRVMR)
आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, [QBR] आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले, [QBR] आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला. [QBR]
उत्पत्ति 49 : 16 (IRVMR)
इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील. [QBR]
उत्पत्ति 49 : 17 (IRVMR)
तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, [QBR] वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल. [QBR] तो घोड्याच्या टाचेला दंश करील. [QBR] त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल. [QBR]
उत्पत्ति 49 : 18 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे. [QBR]
उत्पत्ति 49 : 19 (IRVMR)
गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल, [QBR] परंतु तो त्यांच्या पार्श्वभागावर हल्ला करून त्यांना पळवून लावील. [QBR]
उत्पत्ति 49 : 20 (IRVMR)
आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील. [QBR2]
उत्पत्ति 49 : 21 (IRVMR)
नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे. [QBR] त्याचे बोलणे गोड असेल. [QBR]
उत्पत्ति 49 : 22 (IRVMR)
योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे. [QBR] तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत. [QBR]
उत्पत्ति 49 : 23 (IRVMR)
तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला. [QBR] आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला. [QBR]
उत्पत्ति 49 : 24 (IRVMR)
तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील, [QBR] आणि त्याचे बाहु कुशल होतील याकोबाचा सामर्थ्यवान देव, [QBR] मेंढपाळ, इस्राएलाचा खडक याजकडून त्याच्या हातांना शक्ती मिळते. [QBR]
उत्पत्ति 49 : 25 (IRVMR)
कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील, [QBR] आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद, [QBR] खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो, [QBR] तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो. [QBR]
उत्पत्ति 49 : 26 (IRVMR)
तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील, [QBR] अथवा सर्वकाळ टिकून राहणाऱ्या डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इच्छित वस्तुंहून श्रेष्ठ होतील. [QBR] ते योसेफाच्या मस्तकावर, जो आपल्या भावांमध्ये राजपुत्र [QBR] त्याच्या मस्तकावर आशीर्वाद असे राहतील. [PE][PS]
उत्पत्ति 49 : 27 (IRVMR)
बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.”
उत्पत्ति 49 : 28 (IRVMR)
हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला. [PS]
उत्पत्ति 49 : 29 (IRVMR)
{याकोबाचा मृत्यू व त्याचे दफन} [PS] मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे,
उत्पत्ति 49 : 30 (IRVMR)
ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.
उत्पत्ति 49 : 31 (IRVMR)
अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.
उत्पत्ति 49 : 32 (IRVMR)
ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.”
उत्पत्ति 49 : 33 (IRVMR)
आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: