उत्पत्ति 5 : 1 (IRVMR)
{आदामाचे वंशज} [PS] आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
उत्पत्ति 5 : 2 (IRVMR)
त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 3 (IRVMR)
आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
उत्पत्ति 5 : 4 (IRVMR)
शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
उत्पत्ति 5 : 5 (IRVMR)
अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 6 (IRVMR)
शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला
उत्पत्ति 5 : 7 (IRVMR)
अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
उत्पत्ति 5 : 8 (IRVMR)
शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 9 (IRVMR)
अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;
उत्पत्ति 5 : 10 (IRVMR)
केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
उत्पत्ति 5 : 11 (IRVMR)
अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 12 (IRVMR)
केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;
उत्पत्ति 5 : 13 (IRVMR)
महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
उत्पत्ति 5 : 14 (IRVMR)
केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 15 (IRVMR)
महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;
उत्पत्ति 5 : 16 (IRVMR)
यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
उत्पत्ति 5 : 17 (IRVMR)
महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 18 (IRVMR)
यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;
उत्पत्ति 5 : 19 (IRVMR)
हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
उत्पत्ति 5 : 20 (IRVMR)
यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
उत्पत्ति 5 : 21 (IRVMR)
हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला;
उत्पत्ति 5 : 22 (IRVMR)
मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
उत्पत्ति 5 : 23 (IRVMR)
हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;
उत्पत्ति 5 : 24 (IRVMR)
हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 25 (IRVMR)
मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.
उत्पत्ति 5 : 26 (IRVMR)
लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
उत्पत्ति 5 : 27 (IRVMR)
मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 28 (IRVMR)
लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.
उत्पत्ति 5 : 29 (IRVMR)
लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 30 (IRVMR)
नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
उत्पत्ति 5 : 31 (IRVMR)
लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला. [PE][PS]
उत्पत्ति 5 : 32 (IRVMR)
नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: