उत्पत्ति 6 : 1 (IRVMR)
{मानवांची दुष्टाई} [PS] पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या,
उत्पत्ति 6 : 2 (IRVMR)
तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी [* स्वर्गीय आत्मे ] पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या.
उत्पत्ति 6 : 3 (IRVMR)
परमेश्वर म्हणाला, “माझा आत्मा [† जीवन देणारा आत्मा] मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.” [PE][PS]
उत्पत्ति 6 : 4 (IRVMR)
त्या दिवसात आणि त्यानंतरही, महाकाय मानव [‡ राक्षस] पृथ्वीवर होते. देवाचे पुत्र मनुष्यांच्या मुलीपाशी गेले, आणि त्यांच्याकडून त्यांना मुले झाली, तेव्हा हे घडले. प्राचीन काळचे जे बलवान, नामांकित पुरूष ते हेच. [PE][PS]
उत्पत्ति 6 : 5 (IRVMR)
पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले.
उत्पत्ति 6 : 6 (IRVMR)
म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला. [PE][PS]
उत्पत्ति 6 : 7 (IRVMR)
म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.”
उत्पत्ति 6 : 8 (IRVMR)
परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली. [PS]
उत्पत्ति 6 : 9 (IRVMR)
{नोहा आणि तारू} [PS] या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला
उत्पत्ति 6 : 10 (IRVMR)
नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन पुत्र होते. [PE][PS]
उत्पत्ति 6 : 11 (IRVMR)
देवाच्या समक्षतेत पृथ्वी भ्रष्ट झालेली होती, आणि हिंसाचाराने भरलेली होती.
उत्पत्ति 6 : 12 (IRVMR)
देवाने पृथ्वी पाहिली; आणि पाहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता. इब्री. 11:7; 1 पेत्र. 3:20 [PE][PS]
उत्पत्ति 6 : 13 (IRVMR)
{तारू} [PS] म्हणून देव नोहाला म्हणाला, “मी पाहतो की, सर्व प्राण्यांचा नाश करण्याची वेळ आता आली आहे; कारण त्यांच्यामुळे पृथ्वी अनर्थ हिंसाचाराने भरली आहे. खरोखरच मी पृथ्वीसह त्यांचा नायनाट करीन.”
उत्पत्ति 6 : 14 (IRVMR)
तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर; तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव.
उत्पत्ति 6 : 15 (IRVMR)
देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे. [PE][PS]
उत्पत्ति 6 : 16 (IRVMR)
तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर.
उत्पत्ति 6 : 17 (IRVMR)
आणि ऐक, आकाशाखाली ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे अशा सर्व देहधाऱ्यांचा नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. पृथ्वीवर जे सर्व आहे ते मरण पावतील. [PE][PS]
उत्पत्ति 6 : 18 (IRVMR)
मी तुझ्याबरोबर आपला एक करार स्थापीन. तू, तुझ्यासोबत तुझे पुत्र, तुझी पत्नी आणि तुझ्या सुना यांना घेऊन तारवात जाशील.
उत्पत्ति 6 : 19 (IRVMR)
तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यांपैकी दोन-दोन तुझ्याबरोबर जिवंत ठेवण्यासाठी तुझ्याबरोबर तू तारवात ने; ते नर व मादी असावेत. [PE][PS]
उत्पत्ति 6 : 20 (IRVMR)
पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, आणि मोठ्या पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन दोन जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील.
उत्पत्ति 6 : 21 (IRVMR)
तसेच खाण्यात येते असे सर्व प्रकारचे अन्न तुझ्याजवळ आणून ते साठवून ठेव. ते तुला व त्यांना खाण्यासाठी होईल.”
उत्पत्ति 6 : 22 (IRVMR)
नोहाने हे सर्व केले. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने सर्वकाही केले. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: