इब्री लोकांस 2 : 1 (IRVMR)
या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये.
इब्री लोकांस 2 : 2 (IRVMR)
कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते.
इब्री लोकांस 2 : 3 (IRVMR)
तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
इब्री लोकांस 2 : 4 (IRVMR)
देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
इब्री लोकांस 2 : 5 (IRVMR)
आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही.
इब्री लोकांस 2 : 6 (IRVMR)
पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे [QBR] “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? [QBR] किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा? [QBR]
इब्री लोकांस 2 : 7 (IRVMR)
थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले [QBR] तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस [QBR]
इब्री लोकांस 2 : 8 (IRVMR)
तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवलेस.” [PE][PS] देवाने सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.
इब्री लोकांस 2 : 9 (IRVMR)
परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
इब्री लोकांस 2 : 10 (IRVMR)
देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.
इब्री लोकांस 2 : 11 (IRVMR)
जो लोकांस पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही.
इब्री लोकांस 2 : 12 (IRVMR)
तो म्हणतो, [QBR] मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन [QBR] मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन. [QBR]
इब्री लोकांस 2 : 13 (IRVMR)
तो आणखी म्हणतो, [QBR] “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” [QBR] आणि तो पुन्हा म्हणतो, [QBR] येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत. [PE][PS]
इब्री लोकांस 2 : 14 (IRVMR)
म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
इब्री लोकांस 2 : 15 (IRVMR)
आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय ठेवून त्याचे दास असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.
इब्री लोकांस 2 : 16 (IRVMR)
कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो,
इब्री लोकांस 2 : 17 (IRVMR)
या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा महायाजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.
इब्री लोकांस 2 : 18 (IRVMR)
कारण ज्याअर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: