इब्री लोकांस 3 : 1 (IRVMR)
{प्रभू येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे} [PS] म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा महायाजक आहे.
इब्री लोकांस 3 : 2 (IRVMR)
देवाच्या संपूर्ण घराण्यात जसा मोशे देवाशी विश्वासू होता तसा ज्या देवाने त्यास प्रेषित व महायाजक म्हणून नेमले त्याच्याशी तो विश्वासू होता.
इब्री लोकांस 3 : 3 (IRVMR)
ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाऱ्याला अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.
इब्री लोकांस 3 : 4 (IRVMR)
कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण सर्वकाही देवाने बांधलेले आहे. [PE][PS]
इब्री लोकांस 3 : 5 (IRVMR)
देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देवाच्या गोष्टी पुढील काळात ज्या होणार होत्या, त्याविषयी त्याने लोकांस साक्ष दिली.
इब्री लोकांस 3 : 6 (IRVMR)
परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे. स्तोत्र. 95:7-11 [PE][PS]
इब्री लोकांस 3 : 7 (IRVMR)
{विश्वासूपणा} [PS] म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे, [QBR] “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, [QBR]
इब्री लोकांस 3 : 8 (IRVMR)
तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. [QBR] ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी [QBR] अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली, [QBR]
इब्री लोकांस 3 : 9 (IRVMR)
जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, [QBR] तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.” [QBR]
इब्री लोकांस 3 : 10 (IRVMR)
त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि [QBR] मी म्हणालो, “या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात, [QBR] या लोकांनी माझे मार्ग कधीही जाणले नाहीत.” [QBR]
इब्री लोकांस 3 : 11 (IRVMR)
म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, [QBR] “हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.” [PS]
इब्री लोकांस 3 : 12 (IRVMR)
{शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता} [PS] बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. [PE][PS]
इब्री लोकांस 3 : 13 (IRVMR)
जोपर्यंत, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.
इब्री लोकांस 3 : 14 (IRVMR)
कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.
इब्री लोकांस 3 : 15 (IRVMR)
पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे; [QBR] “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, [QBR] तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” [PE][PS]
इब्री लोकांस 3 : 16 (IRVMR)
ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुध्द बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने मिसर देशातून बाहेर नेले होते?
इब्री लोकांस 3 : 17 (IRVMR)
आणि तो कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.
इब्री लोकांस 3 : 18 (IRVMR)
कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?
इब्री लोकांस 3 : 19 (IRVMR)
ह्यावरून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: