होशेय 1 : 1 (IRVMR)
होशेयची जारिणी पत्नी व तिची मुले होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.
होशेय 1 : 2 (IRVMR)
हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला, “जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे.”
होशेय 1 : 3 (IRVMR)
म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.
होशेय 1 : 4 (IRVMR)
परमेश्वर होशेयला म्हणाला, त्याचे नाव इज्रेल* अर्थ-परमेश्वर विखरतो ठेव, कारण काही वेळानंतर मी येहूच्या घराण्याला त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे † इज्रेल शहरामध्ये येहुने इस्राएलचा राजा आणि राजघराण्यातील त्याच्या सर्व लोकांचा खून केला, आणि नवीन राज्याचा पहिला राजा बनला - 2 राजे 9-10 पहा. शिक्षा करणार आहे व इस्राएल घराण्याच्या राज्याचा शेवट करणार आहे.
होशेय 1 : 5 (IRVMR)
त्या दिवशी मी इज्रेलच्या दरीत इस्राएलचे धनुष्य मोडेन.
होशेय 1 : 6 (IRVMR)
गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला हिचे नांव लो-रुहामा‡ अर्थ-दया नसणारा ठेव कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.
होशेय 1 : 7 (IRVMR)
तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई, घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना स्वबळाने सोडवेन.
होशेय 1 : 8 (IRVMR)
मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला.
होशेय 1 : 9 (IRVMR)
मग परमेश्वर म्हणाला, त्याचे नांव लो-अम्मी ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मी तुमचा देव नाही.
होशेय 1 : 10 (IRVMR)
जरी इस्राएलच्या लोकांची संख्या समुद्राच्या वाळूकणांसारखी असेल जी मोजता येत नाही हे असे घडेल की, जिथे तुम्ही माझे लोक नव्हते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील.
होशेय 1 : 11 (IRVMR)
यहूदाचे लोक व इस्राएलचे लोक एकत्र येऊन आपणावर एक पुढारी नेमतील व त्या देशातून निघून येतील तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11