होशेय 12 : 1 (IRVMR)
लबाडी व छळ ह्यांबद्दल एफ्राइमाचा निषेध एफ्राईम वारा जोपासतो, आणि पूर्वेच्या वाऱ्याचा पाठलाग करतो, तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो, तो अश्शूरांशी करार करतो, आणि मिसरात जैतूनाचे तोल घेऊन जातो.
होशेय 12 : 2 (IRVMR)
परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे. आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील. त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.
होशेय 12 : 3 (IRVMR)
गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली, आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.
होशेय 12 : 4 (IRVMR)
त्या स्वर्गदूताशी झोंबी केली, आणि जिंकला, त्याने रडून देवाची करुणा भाकली, तो बेथेलास देवाला भेटला, देव तेथे त्याच्याबरोबर बोलला.
होशेय 12 : 5 (IRVMR)
हा परमेश्वर, सेनेचा देव ज्यांचे स्मरण ‘परमेश्वर’ नावाने होते.
होशेय 12 : 6 (IRVMR)
म्हणून तू आपल्या देवाकडे वळ, विश्वासू आणि न्यायी राहून त्याचा करार पाळ, आणि तुझ्या देवाची निरंतर वाट पहा.
होशेय 12 : 7 (IRVMR)
व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहेत, फसवेगिरी करण्याची त्यांना आवड आहे.
होशेय 12 : 8 (IRVMR)
एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे, माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे. माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही, ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”
होशेय 12 : 9 (IRVMR)
मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे, नेमलेल्या सणाच्या दिवसाप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत वसविणार.
होशेय 12 : 10 (IRVMR)
मी संदेष्टयांशी देखील बोललो आहे. आणि त्यांना मी पुष्कळ दृष्टांत दिले आहेत, मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.
होशेय 12 : 11 (IRVMR)
जर गिलादामध्ये दुष्टता असली तर निश्चितच लोक नालायक आहेत. गिलादात ते बैल अर्पण करतात, त्यांच्या वेद्यांची संख्या शेतातील तासामध्ये असलेल्या दगडाएवढी आहे.
होशेय 12 : 12 (IRVMR)
याकोब अरामाच्या मैदानात पळून गेला. इस्राएलाने पत्नीसाठी चाकरी केली आपल्या पत्नीसाठी मेंढरे राखली.
होशेय 12 : 13 (IRVMR)
परमेश्वराने एका संदेष्ट्याद्वारे मिसरातून इस्राएलास बाहेर काढले, आणि संदेष्ट्याद्वारेच त्यांची काळजी घेतली.
होशेय 12 : 14 (IRVMR)
एफ्राईमाने परमेश्वराचा क्रोध अत्यंत चेतवला आहे. म्हणून त्याचा धनी त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्यावर आणिल आणि त्याच्या लज्जास्पद कामाची त्यास परतफेड करील.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14