होशेय 5 : 1 (IRVMR)
इस्त्राएलास बेइमानीबद्दल शिक्षा याजकांनो! हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे तुम्ही मिस्पावर पाश आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.
होशेय 5 : 2 (IRVMR)
बंडखोर खोल कत्तलीत राहतात पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन.
होशेय 5 : 3 (IRVMR)
एफ्राईम मला माहित आहे आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही. एफ्राईम तू एका वेश्येसारखा झाला आहेस, इस्राएल अशुद्ध झाला आहे.
होशेय 5 : 4 (IRVMR)
त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो; आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत.
होशेय 5 : 5 (IRVMR)
इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो, इस्राएल व एफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार, आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल.
होशेय 5 : 6 (IRVMR)
ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील, परंतू तो त्यांना सापडणार नाही, कारण त्याने त्यांचा त्याग केला आहे.
होशेय 5 : 7 (IRVMR)
ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले; कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन.
होशेय 5 : 8 (IRVMR)
गिबात शिंग आणि रामात तुतारी फुंका; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ अविन येथे करा.
होशेय 5 : 9 (IRVMR)
शासनाच्या दिवशी एफ्राईम नाश पावेल, इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे.
होशेय 5 : 10 (IRVMR)
यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत, मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार.
होशेय 5 : 11 (IRVMR)
एफ्राईमाचा चुराडा झाला आहे, न्यायामध्ये त्याचा चुराडा झाला आहे, कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरवले आहे.
होशेय 5 : 12 (IRVMR)
ह्यास्तव मी एफ्राईमाला कसर आणि यहूदाच्या घराण्यास किडीसारखा होईन.
होशेय 5 : 13 (IRVMR)
जेव्हा एफ्राईमाने आपला रोग आणि यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला, आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला; पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करू शकला नाही.
होशेय 5 : 14 (IRVMR)
हयास्तव मी एफ्राईमास सिंह आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईन, आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल.
होशेय 5 : 15 (IRVMR)
मी आपल्या स्थानी परत जाईन, जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत; जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15