होशेय 6 : 1 (IRVMR)
इस्त्राएलाच्या पश्चात्तापाचा खोटेपणा “चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.
होशेय 6 : 2 (IRVMR)
दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.
होशेय 6 : 3 (IRVMR)
चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
होशेय 6 : 4 (IRVMR)
एफ्राईमा मी तुला काय करु? यहूदा मी तुला काय करु? तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे, आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे.
होशेय 6 : 5 (IRVMR)
म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे, माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे. तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे.
होशेय 6 : 6 (IRVMR)
कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.
होशेय 6 : 7 (IRVMR)
आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला, ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले.
होशेय 6 : 8 (IRVMR)
गिलाद हे दुष्टांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पाऊले उमटली आहे.
होशेय 6 : 9 (IRVMR)
जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.
होशेय 6 : 10 (IRVMR)
इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे, एफ्राईमाचा व्यभिचार तेथे आहे, आणि इस्राएल प्रदुषित झाला आहे.
होशेय 6 : 11 (IRVMR)
तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करीन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11