होशेय 8 : 1 (IRVMR)
मूर्तीपूजेबद्दल इस्त्राएलाचा निषेध “मुखाला तुतारी लाव, परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे, हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे.
होशेय 8 : 2 (IRVMR)
ते माझा धावा करतात, माझ्या देवा, आम्ही इस्राएली तुला जाणतो”
होशेय 8 : 3 (IRVMR)
पण इस्राएलाने जे चांगले ते नाकारले आहे, आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल.
होशेय 8 : 4 (IRVMR)
त्यांनी राजे नेमले, पण माझ्या द्वारे नाही; त्यांनी राजपुत्र स्थापले आहे, पण माझे ज्ञान न घेता त्यांनी, आपले सोने व चांदी घेऊन, स्वत:साठी मूर्ती बनविल्या आहेत. त्यानेच ते नाश पावतील.
होशेय 8 : 5 (IRVMR)
संदेष्टा म्हणतो, हे शोमरोना तुझे वासरू त्याने नाकारले आहे, परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुध्द माझा राग पेटेल, किती वेळ ते अशुद्ध राहणार?
होशेय 8 : 6 (IRVMR)
कारण ही मूर्ती इस्राएलातून आली, कारागिराने बनवली, ती देव नाही शोमरोनाच्या वासराचे तुकडे होतील.
होशेय 8 : 7 (IRVMR)
कारण लोक वारा पेरतात आणि वावटळीची कापणी करतात, उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही, आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली तरी परके त्यास गिळून टाकतील.
होशेय 8 : 8 (IRVMR)
इस्राएलास गिळले आहे, आता ते देशामध्ये बिन कामाची लबाडी करतात.
होशेय 8 : 9 (IRVMR)
कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले, एफ्राईमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत.
होशेय 8 : 10 (IRVMR)
जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले, तरी मी त्यांना आता एकत्र करीन. राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील.
होशेय 8 : 11 (IRVMR)
कारण एफ्राईमाने पापबलींसाठी आपल्या वेद्या वाढवल्या आहेत, पण त्या वेद्या पाप करण्याचे कारण ठरल्या आहेत.
होशेय 8 : 12 (IRVMR)
मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहीले, पण ते त्याकडे अनोळख्या सारखे पाहतात.
होशेय 8 : 13 (IRVMR)
मला अर्पणे करावी म्हणून ते मांस देतात व खातात, पण मी परमेश्वर, ते स्वीकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार, ते मिसर देशात परत जातील.
होशेय 8 : 14 (IRVMR)
इस्राएलाला आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा विसर पडला आहे आणि त्याने महाल बांधले आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत, पण मी त्याच्या शहरावर अग्नी पाठवीन, तो त्याची तटबंदी नष्ट करून टाकेल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14