यशया 13 : 1 (IRVMR)
{बाबेलाविषयी देववाणी} [PS] आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा. [QBR]
यशया 13 : 2 (IRVMR)
उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, [QBR] त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा. [QBR]
यशया 13 : 3 (IRVMR)
मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे, [QBR] होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे. [QBR]
यशया 13 : 4 (IRVMR)
अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, [QBR] अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे. [QBR]
यशया 13 : 5 (IRVMR)
ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. [QBR] परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे. [QBR]
यशया 13 : 6 (IRVMR)
आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे. [QBR]
यशया 13 : 7 (IRVMR)
त्यामुळे सर्व हात गळाले आहेत, आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे; [QBR]
यशया 13 : 8 (IRVMR)
ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. [QBR] ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील. [QBR]
यशया 13 : 9 (IRVMR)
पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे [QBR] अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे. [QBR]
यशया 13 : 10 (IRVMR)
आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. [QBR] अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही. [QBR]
यशया 13 : 11 (IRVMR)
मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. [QBR] मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील. [QBR]
यशया 13 : 12 (IRVMR)
मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफीरच्या शुध्द सोन्याहून शोधण्यास कठिण करील. [QBR]
यशया 13 : 13 (IRVMR)
म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल, [QBR] सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल. [QBR]
यशया 13 : 14 (IRVMR)
शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, [QBR] प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल. [QBR]
यशया 13 : 15 (IRVMR)
जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल. [QBR]
यशया 13 : 16 (IRVMR)
त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. [QBR] त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील. [QBR]
यशया 13 : 17 (IRVMR)
पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन, [QBR] ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही. [QBR]
यशया 13 : 18 (IRVMR)
त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत. [QBR]
यशया 13 : 19 (IRVMR)
आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल, [QBR] तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल. [QBR]
यशया 13 : 20 (IRVMR)
ती कधी वसविली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत. [QBR] अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाहीत. [QBR]
यशया 13 : 21 (IRVMR)
परंतु रानातील जंगली पशू तेथे पडतील. त्यांची घरे घुबडांनी भरतील; [QBR] आणि शहामृग व रानबोकड तेथे उड्या मारतील. [QBR]
यशया 13 : 22 (IRVMR)
तरस त्यांच्या किल्ल्यात आणि कोल्हे त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही. [PE]
❮
❯