यशया 27 : 1 (IRVMR)
{इस्राएलाची मुक्तता व एकत्रीकरण} [PS] त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील. [QBR]
यशया 27 : 2 (IRVMR)
तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील. [QBR]
यशया 27 : 3 (IRVMR)
“मी परमेश्वर, तिची नीगा राखणारा, मी प्रत्येक क्षणी तिला पाणी घातले; [QBR] त्यामुळे कोणीही तिला दुखावणार नाही, म्हणून मी रात्र दिवस तिचे राखण करतो. [QBR]
यशया 27 : 4 (IRVMR)
मी रागवलेलो नाही, लढाईत माझ्यापुढे काट्यांची झाडे व काटेरी झाडे कोण ठेवील! [QBR] पण युध्दात मी त्याच्या विरूद्ध चाल करून जाईल आणि मी त्यास जाळून नष्ट करून टाकीन. [QBR]
यशया 27 : 5 (IRVMR)
अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे, त्याने माझ्याशी शांती प्रस्थापीत करावी. [QBR]
यशया 27 : 6 (IRVMR)
येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्राएल उमलेले व त्यास नवीन पालवी फुटेल, [QBR] आणि ते जगाची पाठ फळांनी भरतील.” [QBR]
यशया 27 : 7 (IRVMR)
काय परमेश्वराने याकोबावर आणि इस्राएलावर हल्ला केला, जसा त्याने त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर हल्ला केला? अथवा यांनी ज्यांचा वध केला आहे त्यांच्या वधाप्रमाणे यांचा वध करण्यात आला आहे काय? [QBR]
यशया 27 : 8 (IRVMR)
याचप्रकारे तुम्ही याकोब आणि इस्राएलाला दूर [* बंदिवासात] पाठवून अचूक मापदंडांनी [† अचूक मापदंडांनी ] त्यांचा विरोध केला आहे. पुर्वेच्या वाऱ्याच्या दिवशी त्यांना तो प्रचंड वाऱ्याने दूर करतो. [QBR]
यशया 27 : 9 (IRVMR)
याकरीता याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल, आणि त्याचे पाप दूर करण्याचे फळ हेच आहे. [QBR] तो वेदीचे सर्व दगड खडूच्या चूर्ण केलेल्या चुनखड्यासारखे करेल, [QBR] आणि तसेच अशेरा देवीचे खांब किंवा धूप वेदीही उभ्या राहणार नाहीत. [QBR]
यशया 27 : 10 (IRVMR)
कारण तटबंदी असलेले शहर नाश झाले आहे आणि वस्ती असलेले राणासारखी सोडून दिलेली आहे. [QBR] वासरू तेथे चरेल आणि तेथे बसेल आणि त्याच्या फांद्या खाऊन टाकेल. [QBR]
यशया 27 : 11 (IRVMR)
त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील. [QBR] कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव [QBR] ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही. [QBR]
यशया 27 : 12 (IRVMR)
त्या दिवशी असे होईल की, [QBR] परमेश्वर फरात नदीपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या आपल्या पिकाची मळणी करील, [QBR] आणि तुम्ही इस्राएलच्या लोकांनो एकत्र गोळा केले जाणार. [QBR]
यशया 27 : 13 (IRVMR)
त्या दिवशी मोठा कर्णा वाजेल, [QBR] आणि तेव्हा अश्शूर देशामध्ये नाश होणारे आणि मिसर देशात जे घालवले आहेत ते येतील. [QBR] आणि यरूशलेमेस पवित्र पर्वतावर परमेश्वरास पुजतील. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: