यशया 3 : 1 (IRVMR)
{यहूदा व यरूशलेम ह्यांचा परमेश्वराकडून न्याय} [PS] पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, यरूशलेम व यहूदा यांच्यापासून [QBR] आधार व टेका काढून घेत आहे, म्हणजे भाकरीचा संपूर्ण साठा आणि संपूर्ण पाणी पुरवठा काढून घेत आहे; [QBR]
यशया 3 : 2 (IRVMR)
शक्तीमान पुरुष, योद्धा, न्यायधीश, संदेष्टा, ज्योतिषी, वडील, [QBR]
यशया 3 : 3 (IRVMR)
पन्नासांचा कप्तान, प्रतिष्ठित नागरिक, मंत्री, कूशल कारागीर व निपुण जादूगार. [QBR]
यशया 3 : 4 (IRVMR)
“मी फक्त युवकास त्यांचे अधिकारी म्हणून नेमीन, आणि युवक त्यांच्यावर राज्य करतील. [QBR]
यशया 3 : 5 (IRVMR)
सर्व लोक दडपशाहीमुळे धास्तावतील; प्रत्येकजण दुसऱ्यामुळे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेजाऱ्यामुळे; [QBR] लेकरे उद्दामपणे वयोवृद्धांचा विरोध करतील, अधोगती झालेले प्रतिष्ठीतांना आव्हान करतील. [QBR]
यशया 3 : 6 (IRVMR)
आपल्या वडिलाच्याच घरात कोणी आपल्या भावाला जबरदस्तीने म्हणेल, [QBR] आणि तुझ्याजवळ झगा आहे; तू आमचा शासक हो व तुझ्या हाताखाली हे नाश होऊ दे. [QBR]
यशया 3 : 7 (IRVMR)
त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, [QBR] ‘मी बरे करणारा होणार नाही, माझ्याजवळ भाकरी व वस्त्रही नाहीत, [QBR] तुम्ही मला लोकांचा शासक करू नका.’ ” [QBR]
यशया 3 : 8 (IRVMR)
कारण यरूशलेमेचा नाश झाला आहे, व यहूदा पतन पावला आहे, [QBR] कारण त्यांचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उच्च अधिकाराचा अपमान करत आहे. [QBR]
यशया 3 : 9 (IRVMR)
त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्याच विरूद्ध साक्ष देतात; आणि सदोमाप्रमाणे ते त्यांच्या पापाविषयीच्या गोष्टी सांगतात; ते त्या लपवीत नाहीत. [QBR] त्यांचा नाश होवो! कारण त्यांनी स्वतःवर आपत्ती आणली आहे. [QBR]
यशया 3 : 10 (IRVMR)
नीतिमानास सांगा कि त्यांचे भले होईल; कारण ते आपल्या कृतींचे फळ खातील. [QBR]
यशया 3 : 11 (IRVMR)
पाप्याचा नाश होवो! त्याचे वाईट होईल, कारण त्याने आपल्या हाताने जे केले, ते त्यास मिळेल. [QBR]
यशया 3 : 12 (IRVMR)
माझ्या लोकांनो; लेकरे तुम्हावर जुलूम करतात व स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. [QBR] माझ्या लोकांनो, तुमचे पुढारी तुम्हास योग्य मार्गापासून दूर नेतात, व तुमच्या मार्गाविषयी तुम्हास गोंधळात टाकतात. [QBR]
यशया 3 : 13 (IRVMR)
परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे. [QBR]
यशया 3 : 14 (IRVMR)
परमेश्वर वडील जन व त्याच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रकट करील. [QBR] तुम्ही द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरांमध्ये आहे. [QBR]
यशया 3 : 15 (IRVMR)
तुम्ही माझ्या लोकांचा संपूर्ण नाश का करीता व गरिबांना अतिशय यातना का देता? [QBR] असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
यशया 3 : 16 (IRVMR)
{सीयोनकन्यांचा न्याय} [PS] परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत, [QBR] आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात, [QBR] जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात. [QBR]
यशया 3 : 17 (IRVMR)
म्हणून सियोनेच्या कन्यांच्या डोक्यात प्रभू देव रोगग्रस्त खरूज उत्पन्न करील, आणि परमेश्वर त्यांचे टक्कल करील. [QBR]
यशया 3 : 18 (IRVMR)
त्या दिवशी प्रभू त्यांचे सुंदर असे पायातील दागिने, डोक्याचे बंध, गळयातील चंद्रकोरी हार,
यशया 3 : 19 (IRVMR)
कर्णफुले, कंकणे, आणि घुंगट; [QBR]
यशया 3 : 20 (IRVMR)
शिरभूषणे, पैंजणे, कमरपट्टे, सुगंधी द्रव्यांचा डब्ब्या, आणि भाग्यवान आकर्षणे काढून टाकील. [QBR]
यशया 3 : 21 (IRVMR)
तो अंगठ्या, नथी दागिने; [QBR]
यशया 3 : 22 (IRVMR)
सणाचे वस्त्रे, आवरणे, ओढण्या, हातातील बटवे; [QBR]
यशया 3 : 23 (IRVMR)
हातातले आरसे, तलम सणाचे वस्त्र, डोक्यावरील वस्त्रे, आणि ओढण्या काढून टाकील. [QBR]
यशया 3 : 24 (IRVMR)
तेथे गोड सुगंधा ऐवजी दुर्गंध; कमरपट्ट्या ऐवजी रस्सी, [QBR] आकर्षक केशरचने ऐवजी टक्कल, झग्याऐवजी तरटाचे वस्त्र, [QBR] आणि सौंदर्याच्या जागी डाग राहतील. [QBR]
यशया 3 : 25 (IRVMR)
तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील. [QBR]
यशया 3 : 26 (IRVMR)
यरूशलेमेच्या वेशी शोक व विलाप करतील; आणि ती एकटी असेल व जमिनीवर बसून राहील. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: