यशया 31 : 1 (IRVMR)
जे कोणी मदतीसाठी खाली मिसरमध्ये जातात आपल्या घोड्यांवर अवलंबून राहतात त्यांना हायहाय, [QBR] आणि रथांवर (कारण ते पुष्कळ आहेत) आणि घोडस्वारांवर (कारण ते अगणित आहेत) भरवसा ठेवतात. [QBR] परंतु ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत किंवा ते इस्राएलाचा जो पवित्र त्याकडे लक्ष देत नाही! [QBR]
यशया 31 : 2 (IRVMR)
तोही ज्ञानी आहे आणि तो संकटे आणील व आपली वचने माघारी घेणार नाही. [QBR] आणि तो दुष्टांच्या घराण्याविरूद्ध आणि जे कोणी पाप करणाऱ्यांच्या मदतीविरूद्ध उठेल. [QBR]
यशया 31 : 3 (IRVMR)
मिसर मनुष्य आहे देव नाही, त्यांचे घोडे मांस आहेत आत्मा नाही. [QBR] जेव्हा परमेश्वर आपला हात बाहेर लांब करील, तेव्हा दोघेही त्यांना मदत करणारा अडखळेल आणि ज्याची मदत केली तो पडेल; [QBR] दोघांचा नाश होईल. [QBR]
यशया 31 : 4 (IRVMR)
परमेश्वराने मला हे सांगितले आहे, “जसा एखादा सिंह, तरुण सिंह, आपल्या फाडलेल्या भक्ष्यावर गुरगुरतात,” [QBR] जेव्हा मेंढपाळांचा गट बोलावून त्यांच्याविरुद्ध आणला असताही, [QBR] त्यांच्या आवाजाने भयभीत होत नाही, किंवा त्यांच्या गोंगाटाने दबकत नाहीत; [QBR] तसा सेनाधीश परमेश्वर सियोन पर्वतावर, त्याच्या टेकडीवर लढाई करण्यास उतरेल. [QBR]
यशया 31 : 5 (IRVMR)
ज्याप्रमाणे पक्षी घिरट्या घालतो तसा सेनाधीश परमेश्वर यरूशलेमचे रक्षण करील; [QBR] तो तिचे रक्षण करील आणि तो तिच्यावरून ओलांडून जाऊन तिला वाचवील व सुरक्षित ठेविल. [PE][PS]
यशया 31 : 6 (IRVMR)
इस्राएलाच्या लोकांनो, जे तुम्ही त्याच्यापासून तीव्रतेने दूर निघून गेलात ते तुम्ही त्याच्याकडे माघारी या.
यशया 31 : 7 (IRVMR)
कारण त्या दिवशी ते प्रत्येक आपल्या पापी हातांनी तयार केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या मूर्तींचा त्याग करतील. [QBR]
यशया 31 : 8 (IRVMR)
अश्शूर तलवारीने पडेल; जी त्याचा नाश करील ती सत्ताधारी मनुष्याची तलवार नव्हे. [QBR] तो तलवारीपासून पळून जाईल आणि त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल. [QBR]
यशया 31 : 9 (IRVMR)
ते त्यांचा सर्व आत्मविश्वास भयामुळे गमावून बसतील, आणि त्यांचे सरदार परमेश्वराचा युद्धाचा झेंडा बघून घाबरतील [QBR] ज्याचा अग्नी सियोनेत आहे आणि परमेश्वराची भट्टी यरूशलेमेत आहे, त्या परमेश्वराची ही घोषणा आहे. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: