यशया 34 : 1 (IRVMR)
{अदोम व इतर राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा कोप} [PS] तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत. [QBR]
यशया 34 : 2 (IRVMR)
कारण सर्व राष्ट्रावर परमेश्वर रागावला आहे आणि त्यांच्या सैन्यांविरूद्ध संताप झाला आहे; [QBR] त्याने त्यांचा समूळ नाश केला आहे. त्याने त्यांचा संहार करण्यासाठी त्यांच्या हवाली केले आहे. [QBR]
यशया 34 : 3 (IRVMR)
त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल, [QBR] आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल. [QBR]
यशया 34 : 4 (IRVMR)
आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील, [QBR] आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल; आणि सर्व तारे लुप्त होतील, [QBR] जसे द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, जसा अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो. [QBR]
यशया 34 : 5 (IRVMR)
ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, [QBR] पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल. [QBR]
यशया 34 : 6 (IRVMR)
परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे, [QBR] ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे. [QBR] कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे. [QBR]
यशया 34 : 7 (IRVMR)
रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल. [QBR] त्यांची भूमी रक्त पिईल व तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल. [QBR]
यशया 34 : 8 (IRVMR)
कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे. [QBR]
यशया 34 : 9 (IRVMR)
अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल, [QBR] आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल. [QBR]
यशया 34 : 10 (IRVMR)
तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल. [QBR] ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही. [QBR]
यशया 34 : 11 (IRVMR)
पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील. [QBR] तो तिच्यावर अस्ताव्यस्ततेची दोरी ताणील आणि ओसाडीचा ओळंबा लावील. [QBR]
यशया 34 : 12 (IRVMR)
तिच्या सरदारांना [QBR] राज्यावर बोलावतील पण तेथे त्यातले कोण असणार नाहीत, आणि तिचे सर्व अधिपती नाहीसे होतील. [QBR]
यशया 34 : 13 (IRVMR)
तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील. [QBR] ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल. [QBR]
यशया 34 : 14 (IRVMR)
हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील. [QBR] निशाचर प्राणीही तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल. [QBR]
यशया 34 : 15 (IRVMR)
तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील. [QBR] होय, घार आपआपल्या जोडीदारांसोबत जमा होतील. [QBR]
यशया 34 : 16 (IRVMR)
परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही. [QBR] कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे. [QBR]
यशया 34 : 17 (IRVMR)
त्यांच्या जागेसाठी त्यांनी चिठ्ठी टाकली आहे, आणि त्याने आपल्या हाताने ती भूमी दोरीने मापून त्यांना वाटून दिली आहे. [QBR] ते त्यांचे सर्वकाळचे वतनदार होतील; ते पिढ्यानपिढ्या त्यामध्ये राहतील. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: