यशया 45 : 1 (IRVMR)
{कोरेशास नेमून दिलेली कामगिरी} [PS] परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो, [QBR] ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे, [QBR] आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील. [QBR]
यशया 45 : 2 (IRVMR)
मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन; [QBR] मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन [QBR]
यशया 45 : 3 (IRVMR)
आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन. [QBR] अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे. [QBR]
यशया 45 : 4 (IRVMR)
कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी, [QBR] मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले. [QBR]
यशया 45 : 5 (IRVMR)
मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही. [QBR] जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले. [QBR]
यशया 45 : 6 (IRVMR)
अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही. [QBR] मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही. [QBR]
यशया 45 : 7 (IRVMR)
मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; [QBR] मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.
यशया 45 : 8 (IRVMR)
{परमेश्वर हाच उत्पन्नकर्ता} [PS] हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो. [QBR] पृथ्वी ते शोषून घेवो, त्या तारणास अंकुर फुटोत [QBR] आणि त्याचबरोबर धार्मिकता एकत्रित वाढो. मी परमेश्वराने त्या दोघांना निर्मिले आहे. [QBR]
यशया 45 : 9 (IRVMR)
जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय! [QBR] मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो? [QBR]
यशया 45 : 10 (IRVMR)
जो आपल्या पित्याला म्हणतो, तू काय जन्म देतोस? किंवा स्त्रीस म्हणतो, तू काय जन्म देतेस? त्यास हायहाय! असो. [QBR]
यशया 45 : 11 (IRVMR)
इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे, [QBR] येणाऱ्या गोष्टीविषयी मला कोण विचारणार, तुम्ही माझ्या मुलांविषयी प्रश्न कराल का? तुझ्या हातच्या कामाबद्दल काय करायचे ते मला सांग? [QBR]
यशया 45 : 12 (IRVMR)
मी पृथ्वी केली व तिच्यावर माणसे निर्माण केली. [QBR] मी माझ्या हाताने आकाश पसरीले, आणि मी सर्व ताऱ्यांना दिसण्याची आज्ञा दिली. [QBR]
यशया 45 : 13 (IRVMR)
मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील. [QBR] तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला न घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. [QBR]
यशया 45 : 14 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत, [QBR] ही तुजजवळ आणली जातील. ते तुझे होतील. ते तुझ्यामागे साखळ्यांनी बांधलेले येतील. [QBR] ते तुझ्या पाया पडून तुझ्याजवळ विनंतीकरून म्हणतील, [QBR] खात्रीने देव तुझ्याबरोबर आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही [QBR]
यशया 45 : 15 (IRVMR)
हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस. [QBR]
यशया 45 : 16 (IRVMR)
ते सर्व एकंदरीत लज्जित व फजित होतील; ज्यांनी ओतीव मूर्ती घडविल्या आहेत ते अपमानीत होऊन चालतील. [QBR]
यशया 45 : 17 (IRVMR)
पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल; [QBR] तुम्ही पुन्हा कधीही लज्जित किंवा अपमानीत होणार नाही. [QBR]
यशया 45 : 18 (IRVMR)
आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव, [QBR] ज्याने पृथ्वी निर्माण केली व घडवली, तिची स्थापना केली. [QBR] ती त्याने उजाड अशी निर्मिली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो परमेश्वर असे म्हणतो, [QBR] “मीच परमेश्वर आहे व दुसरा कोणी नाही.” [QBR]
यशया 45 : 19 (IRVMR)
मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही; [QBR] तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही. [QBR] मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे.
यशया 45 : 20 (IRVMR)
{बाबेलच्या मूर्ती आणि परमेश्वर} [PS] जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या. [QBR] जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही. [QBR]
यशया 45 : 21 (IRVMR)
त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या. [QBR] पूर्वीपासून तुम्हास हे कोणी दाखवले आहे? ते कोणी जाहीर केले? [QBR] मी, परमेश्वरानेच की नाही? तर जो मी न्यायी देव व तारणारा त्या माझ्यावाचून कोणी दुसरा देव नाही; माझ्यावाचून कोणी नाही. [QBR]
यशया 45 : 22 (IRVMR)
अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा; [QBR] कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही. [QBR]
यशया 45 : 23 (IRVMR)
मी आपली शपथ वाहीली आहे, [QBR] न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की [QBR] माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील. [QBR]
यशया 45 : 24 (IRVMR)
माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे. [QBR] जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील. [QBR]
यशया 45 : 25 (IRVMR)
इस्राएलाचा सर्व वंश परमेश्वराच्याठायी नीतिमान ठरेल; ते त्याचा अभिमान बाळगतील. [PE]
❮
❯