यशया 6 : 1 (IRVMR)
{#1यशयाला झालेले दर्शन आणि पाचारण [BR]यहे. 1:4-28 } [PS]उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते.
यशया 6 : 2 (IRVMR)
त्याच्याबाजूला सराफीम होते; प्रत्येकाला सहा पंख होते; दोहोंनी प्रत्येकजण आपला चेहरा झाकीत; आणि दोहोंनी आपले पाय झाकी; आणि दोहोंनी उडे. [PE]
यशया 6 : 4 (IRVMR)
[PS]प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.” [PE]
यशया 6 : 5 (IRVMR)
[PS]जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले. [PE][QS]तेव्हा मी म्हणालो, [QE][QS]“मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, [QE][QS]आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, [QE][QS]कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.” [QE]
यशया 6 : 6 (IRVMR)
[PS]मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता.
यशया 6 : 7 (IRVMR)
त्याने तो माझ्या तोंडाला स्पर्श केले आणि म्हटले, [PE][QS]“बघ, ह्याने तुझ्या ओठांना स्पर्श केला आहे; तुझा दोष काढून टाकण्यात आला आहे आणि तुझ्या पापाची भरपाई झाली आहे.” [QE]
यशया 6 : 9 (IRVMR)
[PS]मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?” मग मी म्हणालो, “मी येथे आहे; मला पाठव.” [PE][QS]तो म्हणाला, “जा आणि या लोकांस सांग, [QE][QS]ऐका, पण समजू नका; पाहा, पण ग्रहण करू नका. [QE]
यशया 6 : 10 (IRVMR)
[QS]त्यांनी डोळ्यांनी पाहू नये किंवा कानांनी ऐकू नये आणि त्याच्या हृदयाने समजू नये, [QE][QS]आणि मग पुन्हा वळू नये व बरे होऊ नये म्हणून या लोकांचे हृदय कठीण कर, आणि त्यांचे कान बहीरे, आणि डोळे आंधळे कर.” [QE]
यशया 6 : 11 (IRVMR)
[PS]तेव्हा मी म्हटले, “प्रभू, असे किती वेळपर्यंत?” त्याने उत्तर दिले, [PE][QS]“नगरे चिरडून उध्वस्त आणि रहिवाशांविरहित होईपर्यंत, आणि घरे लोकविरहीत व जमीन उजाड वैराण होईपर्यंत, [QE]
यशया 6 : 12 (IRVMR)
[QS]आणि परमेश्वर लोकांस खूप दूर घालवून देईपर्यंत आणि देशात एकाकीपण येईपर्यंत. [QE]
यशया 6 : 13 (IRVMR)
[QS]तेथे दहा टक्के जरी उरले तरी पुन्हा ते नगर नाश होईल.” [QE][QS]तरी एला किंवा अल्लोन ही झाडे तोडल्यावर त्यांचा बुंधा राहतो [QE][QS]त्याच्या बुंध्यात पवित्र बीज आहे. [QE]
❮
❯