यशया 60 : 1 (IRVMR)
{सीयोनेचे भावी ऐश्वर्य} [PS] “उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.” [QBR]
यशया 60 : 2 (IRVMR)
जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल, [QBR] तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल. [QBR]
यशया 60 : 3 (IRVMR)
राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील. [QBR]
यशया 60 : 4 (IRVMR)
तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. [QBR] तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील. [QBR]
यशया 60 : 5 (IRVMR)
तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासीत होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल. [QBR] कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल. [QBR]
यशया 60 : 6 (IRVMR)
मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, [QBR] शेबातले सर्व येतील, [QBR] ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील. [QBR]
यशया 60 : 7 (IRVMR)
केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. [QBR] ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन. [QBR]
यशया 60 : 8 (IRVMR)
हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात? [QBR]
यशया 60 : 9 (IRVMR)
द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, [QBR] आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, [QBR] म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे. [QBR]
यशया 60 : 10 (IRVMR)
विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. [QBR] “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.” [QBR]
यशया 60 : 11 (IRVMR)
तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. [QBR] ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे. [QBR]
यशया 60 : 12 (IRVMR)
खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील. [QBR]
यशया 60 : 13 (IRVMR)
माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, [QBR] देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील. [QBR]
यशया 60 : 14 (IRVMR)
ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. [QBR] ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील. [QBR]
यशया 60 : 15 (IRVMR)
“तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, [QBR] मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.” [QBR]
यशया 60 : 16 (IRVMR)
तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, [QBR] मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे. [QBR]
यशया 60 : 17 (IRVMR)
“मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, [QBR] आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.” [QBR]
यशया 60 : 18 (IRVMR)
तुझ्या भूमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, [QBR] परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील. [QBR]
यशया 60 : 19 (IRVMR)
“दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही, [QBR] आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही. [QBR] पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल, [QBR] आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.” [QBR]
यशया 60 : 20 (IRVMR)
“तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. [QBR] कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल, [QBR] आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील.” [QBR]
यशया 60 : 21 (IRVMR)
“तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, [QBR] माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.” [QBR]
यशया 60 : 22 (IRVMR)
“जो लहान तो हजार होईल, आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी, परमेश्वर, त्या समयी हे लवकर घडवून आणणार.” [PE]
❮
❯