यशया 62 : 1 (IRVMR)
“मी सियोनेकरीता शांत राहणार नाही, आणि यरूशलेमेकरीता तिचा चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण जळत्या मशालीप्रमाणे निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही.”
यशया 62 : 2 (IRVMR)
मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील. परमेश्वर तुला जे नवे नाव देईल, त्या नावाने तुला हाक मारतील.
यशया 62 : 3 (IRVMR)
तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील.
यशया 62 : 4 (IRVMR)
यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे* हेपझीबा ” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित † बिऊला ” म्हणतील. कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल.
यशया 62 : 5 (IRVMR)
जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले‡ तुझा निर्माणकर्ता तुझ्याशी विवाह करतील. जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील.
यशया 62 : 6 (IRVMR)
हे यरूशलेमे, तुझ्या वेशीवर मी रखवालदार ठेवला आहे. ते रांत्रदिवस गप्प बसणार नाहीत. जे तुम्ही परमेश्वरास स्मरता, ते तुम्ही शांत बसू नका.
यशया 62 : 7 (IRVMR)
यरूशलेमेला पुन:स्थापीपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसनीय करीपर्यंत, त्यास विसावा घेऊ देऊ नका.
यशया 62 : 8 (IRVMR)
परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची आणि सामर्थ्यवान बाहूची शपथ वाहीली आहे, खचित तुमचे धान्य मी तुझ्या शत्रूंना अन्न व्हायला देणार नाही.
यशया 62 : 9 (IRVMR)
जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील, आणि द्राक्षे गोळा करणारा त्याचा द्राक्षरस माझ्या पवित्र भूमीवर पितील.
यशया 62 : 10 (IRVMR)
वेशीतून आत ये, लोकांचा मार्ग तयार करा! बांध, मार्ग तयार कर, रस्त्यावरील दगड बाजूला काढा, राष्ट्रांकरिता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा.
यशया 62 : 11 (IRVMR)
पाहा! परमेश्वराने पृथ्वीच्या सीमेपर्यंत घोषीत केले आहे की, “सियोनेच्या कन्येला सांग, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. त्यांचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्यांचे प्रतिफळ त्याच्यापुढे आहे.”
यशया 62 : 12 (IRVMR)
त्यांना पवित्र लोक, “परमेश्वराने खंडणी भरून सोडवलेले” असे म्हटले जाईल आणि तुला शोधलेली, न टाकलेली नगरी असे म्हटले जाईल.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12