यशया 63 : 1 (IRVMR)
{सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस} [PS] जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? [QBR] जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? [QBR] जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे. [QBR]
यशया 63 : 2 (IRVMR)
तुझी वस्त्रे लालभडक का? आणि ती का द्राक्षांचा रस काढण्याऱ्याच्या कपड्यासारखी आहेत? [QBR]
यशया 63 : 3 (IRVMR)
“मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले आहे आणि राष्ट्रांतील कोणी माझ्याबरोबर नव्हता. [QBR] मी आपल्या रागाने त्यांना तुडवले आणि आपल्या क्रोधाने त्यांना रगडले. [QBR] त्यांचे रक्त माझ्या कपड्यांवर उडाले आणि माझी सर्व कपडे मळीन झाली आहेत. [QBR]
यशया 63 : 4 (IRVMR)
कारण प्रतिकाराच्या दिवसा कडे पाहत आहे, आणि माझ्या खंडून घेतलेल्यांचे वर्ष आले आहे. [QBR]
यशया 63 : 5 (IRVMR)
मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. [QBR] परंतू माझ्याच बाहूने माझ्यासाठी विजय दिला आणि माझ्याच रागाने मला वर नेले. [QBR]
यशया 63 : 6 (IRVMR)
माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.
यशया 63 : 7 (IRVMR)
{इस्राएलासंबंधी परमेश्वराचा चांगुलपणा} [PS] मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन. [QBR] परमेश्वराने आम्हांसाठी जे सर्व केले आणि इस्राएलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन. [QBR] त्याच्या करुणामुळेच ही दया त्याने आम्हांला दाखवली आहे. [QBR]
यशया 63 : 8 (IRVMR)
कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले, जी विश्वासघातकी नाहीत. [QBR] म्हणून तो त्यांचा त्राता झाला. [QBR]
यशया 63 : 9 (IRVMR)
त्यांच्या सर्व दु:खात, [QBR] तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले. [QBR] त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करूणेने त्यांना वाचवले, [QBR] आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले. [QBR]
यशया 63 : 10 (IRVMR)
पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. [QBR] म्हणून तो त्यांचा शत्रू झाला आणि त्यांच्याविरुद्ध लढला. [QBR]
यशया 63 : 11 (IRVMR)
त्याच्या लोकांनी मोशेच्या प्राचीन काळाविषयी विचार केला. [QBR] ते म्हणाले, तो देव कोठे आहे? ज्याने आपल्या कळपाच्या मेंढपाळांसोबत त्यांना समुद्रातून वर आणले, [QBR] देव कोठे आहे? ज्याने आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये घातला [QBR]
यशया 63 : 12 (IRVMR)
ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले, [QBR] आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, तो देव कोठे आहे? [QBR]
यशया 63 : 13 (IRVMR)
तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत. [QBR]
यशया 63 : 14 (IRVMR)
परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला. [QBR] ह्याप्रमाणे तू लोकांस मार्गदर्शन केलेस आणि ह्यासाठी की तुझे प्रतापी होवो.
यशया 63 : 15 (IRVMR)
{दया व साहाय्य ह्यांसाठी प्रार्थना} [PS] स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र व तेजोमय वस्तीतून नोंद घे. [QBR] तुझा आवेश आणि तुझी महतकृत्ये कोठे आहेत? [QBR] तुझी करुणा आणि दयाळू कृती आमच्याकडून ठेवल्या आहेत [QBR]
यशया 63 : 16 (IRVMR)
तू तर आमचा पिता आहेस, [QBR] तरी अब्राहाम आम्हास ओळखत नाही आणि इस्राएलाला आम्ही माहीत नाही. [QBR] परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्वकाळपासून आम्हांला खंडून घेणारा, हे तुझे नाव आहे. [QBR]
यशया 63 : 17 (IRVMR)
परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस? [QBR] तुझ्या सेवकाकरिता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत. [QBR]
यशया 63 : 18 (IRVMR)
तुझी माणसे थोडाच वेळ तुझे पवित्र स्थान ताब्यात घेतील, पण आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडवले. [QBR]
यशया 63 : 19 (IRVMR)
त्या लोकांसारखे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्याना तुझे नाव दिले गेले नाही. [PE]
❮
❯